NEVA : महाराष्ट्र विधिमंडळाचे कागदविरहित कामकाजाच्या दिशेने पाऊल

- 'नेव्हा' प्रणालीचा स्वीकार; तीन महिन्यांत अंमलबजावणी; ८० कोटींचा निधी


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या 'एक राष्ट्र, एक उपयोजन' (वन नेशन, वन ॲप्लिकेशन) ( NEVA) या दूरदर्शी संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज संपूर्णपणे संगणकीय आणि कागदविरहित करण्यासाठी गुरुवारी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मुंबईतील विधान भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधिमंडळात 'नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन' (नेव्हा) ही एकात्मिक संगणकीय कार्यप्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. ( National e Vidhan Application)



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात यापूर्वी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार गुरुवारी या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील पुढील सविस्तर कार्यवाही करण्यात आली. या या बैठकीत या प्रणालीची उद्दिष्टे, तांत्रिक बाबी, अंमलबजावणीची प्रक्रिया आणि सामंजस्य करारातील तरतुदींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर या संदर्भातील सामंजस्य करारावर लवकरच स्वाक्षरी केली जाणार असून पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्रात ही प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ( Maharashtra Vidhan Bhavan)



ही केंद्र सरकारच्या संसदीय कार्य विभागाने विकसित केलेली एक अत्याधुनिक आणि एकात्मिक संगणकीय प्रणाली आहे. देशातील सर्व विधानमंडळ सचिवालयांच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करणे आणि पारदर्शकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. देशातील एकूण ३७ सभागृहांपैकी ३३ सभागृहांकरिता (विधानसभा व विधानपरिषद) यापूर्वीच सामंजस्य करार पूर्ण झाले असून तिथे ही प्रणाली यशस्वीपणे कार्यरत आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी एकूण ८० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, केंद्र व राज्य शासनाच्या ६०:४० अशा खर्च-वाटपाच्या तत्त्वावर मुंबई आणि नागपूर येथील दोन्ही सभागृहांच्या प्रकल्पासाठी हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. (Maharashtra)

एका क्लिकवर मिळणार देशातील संसदीय माहिती


या संगणकीय प्रणालीच्या स्वीकारामुळे महाराष्ट्र विधिमंडळ हे राष्ट्रीय डिजिटल विधिमंडळ व्यवस्थेशी जोडले जाणार आहे. या प्रणालीमुळे महाराष्ट्रातील सर्व आमदारांना लोकसभा, राज्यसभा यांसह देशातील इतर सर्व राज्यांच्या विधानमंडळांमधील कार्यवाही, कार्यवृत्त, नियम, विधेयके, प्रश्नोत्तरे, संदर्भ साहित्य आणि समित्यांचे अहवाल एकाच डिजिटल व्यासपीठावर आणि एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. यामुळे माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक होणार असून, आधुनिक व तंत्रज्ञानाधिष्ठित विधिमंडळ उभारण्याच्या दिशेने हा निर्णय महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. (One Nation One Application)
Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी