Karnatak Doctor Murder : धक्कादायक! मृतदेहाच्या शेजारी बसून मोबाईल बघत होती पत्नी; डॉक्टराची घरातच निर्घृण हत्या; 8 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

कर्नाटकमध्ये डॉक्टर पतीची हत्या, कौटुंबिक कारणावरून खून झाल्याचा संशय


धारवाड : कर्नाटकातील धारवाड येथे एका 45 वर्षीय भूलतज्ज्ञाची (Anesthesiologist) त्याच्याच घरात चाकूने वार करून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात डॉक्टरांचा 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून हत्येमागील कारणांचा शोध सुरू आहे. ( Karnataka News)


मृत डॉक्टरांची ओळख डॉ. किरण होन्ननवार अशी झाली आहे. ते धारवाडमधील एका खासगी रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. ते कर्नाटक युनिव्हर्सिटी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहत होते. ( Murder Case)



नेमकं काय झालं?


बुधवारी सकाळी डॉ. होन्ननवार यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. त्याचवेळी त्यांचा 8 वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी अवस्थेत सापडला. पोलिसांनी तातडीने मुलाला रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात त्याच्यावरही जीवघेणा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.



कौटुंबित वाद असल्याचा संशय


या घटनेनंतर पोलिसांनी घराची पाहणी करून पुरावे गोळा केले. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा संबंध कौटुंबिक वादाशी असू शकतो, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Police Investigation)


धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले की, घटनेच्या आधी डॉक्टरांच्या मोबाईलवर येणारे फोन त्यांच्या पत्नी प्रिया घेत होत्या. नातेवाईक आणि मित्रांना त्यांनी वेगवेगळी माहिती दिल्यामुळे पोलिसांकडून या बाबीचीही चौकशी केली जात आहे.



घटनेवेळी घरात तिघेच होते


पोलिसांच्या माहितीनुसार, घरात त्या वेळी पती, पत्नी आणि मुलगा एवढेच उपस्थित होते. त्यामुळे नेमके काय घडले, याचा तपास सुरू आहे. पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून तिची विधाने नोंदवली जात आहेत. हत्येमागील कारण आणि संपूर्ण घटनाक्रम तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ( Family Dispute)


Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी