Iran - America War : इराणकडे जाणारे तेलवाहू जहाज अमेरिकेने अडवले; नौदल नाकेबंदीनंतरची पहिली मोठी कारवाई

वॉशिंग्टन : अमेरिकेने गुरुवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार बुधवारी) इराणमधील एका बंदराकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तेलवाहू जहाजाला अडवले. होर्मुझ सामुद्रधुनीसंदर्भात इराणविरोधातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनने इराणवरील नौदल नाकेबंदी पुन्हा लागू केल्यानंतर लक्ष्य करण्यात आलेले हे पहिले व्यावसायिक जहाज आहे. (Iran - America War)


यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम)ने एक्सवरील निवेदनात म्हटले आहे, “यूएस सेंट्रल कमांडच्या दलांनी कुरासाओच्या ध्वजाखालील एम/टी बेल्मा हे जहाज आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातून खार्ग बेटाकडे जात असल्याचे निरीक्षण केले. या व्यावसायिक जहाजाने अमेरिकेच्या नाकेबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. अमेरिकेच्या एका विमानाने जहाजाच्या धूरनलिकेवर (स्मोकस्टॅक) हेलफायर क्षेपणास्त्रे डागून जहाजाला थांबवले. आता हे जहाज इराणच्या दिशेने पुढे जात नाही.”ही नाकेबंदी १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता (ईस्टर्न टाइम) पुन्हा लागू करण्यात आली होती. या अंतर्गत अमेरिकन सैन्य इराणी बंदरे आणि किनारी भागांमध्ये ये-जा करणाऱ्या जहाजांना रोखत आहे. (Iran - America War)



सेंटकॉमने सांगितले की, बेल्माविरुद्धची ही कारवाई नाकेबंदी पुन्हा लागू झाल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांत करण्यात आली. अमेरिकन सैन्याच्या मते, आणखी दोन व्यावसायिक जहाजांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून आपला मार्ग बदलला, तर बेल्माने मार्ग बदलण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला अडवण्यात आले. (Iran - America War)



कमांडने म्हटले आहे, “नाकेबंदी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांत सेंटकॉमने निर्देशांचे पालन करणाऱ्या दोन व्यावसायिक जहाजांचा मार्ग बदलला आणि निर्देशांचे पालन न करणारे एक जहाज थांबवले. नियमांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकन सैन्य सतर्क असून आवश्यक कारवाईसाठी सज्ज आहे.” (Iran - America War)

Comments
Add Comment

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

Yemen attack : येमेनजवळ भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 13 भारतीयांसह सर्व 14 खलाशी सुखरूप

येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र