Pune Accident : पंढरपूरच्या वाटेवर काळाचा थरकाप उडवणारा अपघात; वारकऱ्याचा जागीच मृ्त्यू

बारामती : जेजुरीतील भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच पुणे (Pune) जिल्ह्यात वारीदरम्यान आणखी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. बारामतीजवळ मध्यरात्री भरधाव कारने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच (Death) मृत्यू झाला. या घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


मृत वारकऱ्याचे नाव विष्णू रामचंद्र पवार (वय 67) असे असून, ते विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडीसोबत पंढरपूरकडे जात होते. रात्रीच्या वेळी भजन करत प्रवास सुरू असताना भरधाव वेगातील कारने त्यांना जोरदार धडक दिली.



अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या विष्णू पवार यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.



घटनेची माहिती मिळताच बारामती (Baramati) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कारचालकाचा शोध सुरू आहे.


गेल्या काही दिवसांत वारीदरम्यान घडलेल्या सलग अपघातांमुळे वारकऱ्यांच्या (Warkari) सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.







Comments
Add Comment

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास

Buldhana Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची समोरील वाहनाला धडक; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक भीषण अपघाताची