Bay of Bengal Tragedy : बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या दोन बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

ढाका/यांगून : म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट कोसळले आहे. बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी खराब हवामानामुळे उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या संस्था UNHCR आणि IOM यांनी या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. (Bay of Bengal Tragedy)


प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या पश्चिम राखाइन राज्यातून निघाल्या होत्या. काही प्रवाशांनी बांगलादेश सीमेजवळूनही प्रवास सुरू केला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात अचानक हवामान बिघडले आणि समुद्रात उंच लाटा उसळल्याने दोन्ही बोटींचा संपर्क तुटला.
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांच्या माहितीनुसार, पहिल्या बोटीत सुमारे २५० प्रवासी होते. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच या बोटीचा संपर्क तुटला. त्यानंतर ८ जुलै रोजी म्यानमारमधील इरावदी किनाऱ्याजवळ सुमारे २८० प्रवाशांना घेऊन जाणारी दुसरी बोटही उलटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही बोटींमधील मिळून ५३० हून अधिक प्रवासी बेपत्ता असून, त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Bay of Bengal Tragedy)



घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू असून, काही मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. (Bay of Bengal Tragedy)



दरम्यान, पावसाळ्याच्या काळात बंगालच्या उपसागरात समुद्र अत्यंत खवळलेला असल्याने रोहिंग्या निर्वासितांचा समुद्रमार्गे प्रवास अत्यंत धोकादायक ठरतो. UNHCR आणि IOM यांच्या मते, अलीकडील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि खराब हवामानामुळे या भागातील समुद्री प्रवास अधिकच जोखमीचा बनला आहे. मृतांचा आणि बेपत्ता नागरिकांचा अंतिम आकडा अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला, तरी ही अलीकडील काळातील सर्वात मोठ्या सागरी दुर्घटनांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Bay of Bengal Tragedy)

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू