Amravati Murder Case : सिनेमापेक्षाही भयंकर! आधी हाताचा पंजा छाटला अन् मग कोयत्याने सपासप वार केला; नेमकं कारण काय?


प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वाट मिटवायला बोलावून केला घात, २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या


अमरावती : अमरावती (Amravati) शहरात एक अत्यंत थरारक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीच्या राजेंद्र नगर परिसरात एका २४ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांनी एवढ्या अमानुषपणे वार केले की या हल्ल्यात मयत तरुणाचा हाताचा पंजा शरीरापासून वेगळा झाला. या अत्यंत भीषण हत्याकांडामागील मुख्य कारण एक प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले आहे. ( Amravati Murder Case)


नेमकं काय घडलं?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अफाक शेख अकिल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो अमरावती येथील ताज नगर परिसरातील रहिवासी होता. अफाक आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका प्रेमप्रकरणावरून वाद सुरू होता. हाच सुरू असलेला वाद आपसात मिटवण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूचे लोक राजेंद्र नगर परिसरात एकत्र आले होते. मात्र, चर्चा सुरू असतानाच अचानक त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा प्रचंड विकोपाला गेला. या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हत्येत होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने अफाकवर अचानक हल्ला चढवला. (Crime)



शरिरारवर सपासप वार


आरोपींनी पहिला वार अफाकच्या हातावर केला, ज्यामध्ये त्याचा हाताचा पंजा छाटला गेला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेला अफाक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत तिथून पळू लागला. मात्र, निर्दयी हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करणे सोडले नाही. त्यांनी अफाकला गाठून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. (Murder)


या धक्कादायक हत्येचा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमरावती शहराचे पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले की, या हत्याकांडात एकूण ४ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी ३ आरोपी हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपासाची चक्रे वेगवान केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.




Comments
Add Comment

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Jalgaon : जळगाव-ममुराबाद मार्गावर भीषण अपघात, कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू ; संतप्त जमावाने वाहन पेटवले

Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण

Maharashtra Farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! देशी बैलजोडी खरेदीसाठी मिळणार १.२६ लाखांपर्यंत अनुदान; असा करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी देशी बैलजोडी

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे बरसणार मुसळधार?

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. अनेक भागांत पावसाने उघडीप