SIR : दिल्लीसह अनेक राज्यांतील ‘एसआयआर’ला मुदतवाढ, अंतिम मतदार यादी आता 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, दिल्लीची अंतिम मतदार यादी आता 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी ही यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार होती.



दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 14 जुलै रोजी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्यानुसार, संपूर्ण एसआयआर प्रक्रियेच्या विविध टप्प्यांच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून घराघरात जाऊन करण्यात येणाऱ्या मतदार पडताळणीची मुदत आता 8 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया 29 जुलै पर्यंत पूर्ण होणार होती. त्यामुळे प्रत्यक्ष पडताळणीसाठी सुमारे दहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध झाला आहे.



तसेच, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीखही बदलण्यात आली असून ती आता 17 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. यापूर्वी हा मसुदा 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार होता.मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना दावे आणि हरकती नोंदविण्यासाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत मतदार आपल्या नावातील किंवा तपशीलातील त्रुटींविषयी दावे अथवा हरकती सादर करू शकतील. (SIR)



नवीन अधिसूचनेनुसार, अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली जाणार असून संपूर्ण एसआयआर प्रक्रिया सुमारे 12 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील पडताळणीचे काम पूर्ववत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, दिल्लीमध्ये 30 जूनपासून बूथ लेव्हल अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांच्या तपशीलांची प्रत्यक्ष पडताळणी करीत आहेत. अतिरिक्त मुदतीमुळे निवडणूक यंत्रणेला हे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.(Election)

Comments
Add Comment

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या