Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मध्य रेल्वेने मुंबई–पुणे मार्गावरील दोन महत्त्वाच्या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.



झेडआरयूसीसी व एसआरयूसीसी सदस्य सेंट्रल रेल्वे तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाचे सहसंयोजक आणि कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन सोहनलाल परमार यांनी 13 जुलै रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई व पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे मुंबई–पुणे मार्गावर अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक प्रवाशांना स्थानकावरूनच गाडीत चढता येत नसल्याची समस्या त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी इंटरसिटी आणि डेक्कन क्वीन या गाड्या पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. (Devendra Fadnavis )



रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेत उद्या दिनांक 16 जुलैपासून 12127/12128 मुंबई–पुणे–मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस तसेच 12123/12124 मुंबई–पुणे–मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस या दोन्ही गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल नितीन परमार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण