LPG Cylinder Delivery : सिलेंडर संपलं? टेन्शन नॉट; इन्स्टामार्टची नवी ऑन-डिमांड डिलिव्हरी सेवा सुरू; जाणून घ्या कशी करणार काम

मुंबई:  भारतात प्रथमच क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म (Quick commerce platform) इन्स्टामार्टने एलपीजी (LPG) सिलेंडरची ऑन-डिमांड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. यासाठी कंपनीने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) सोबत भागीदारी केली असून, ग्राहक आता थेट ॲपद्वारे एलपीजी सिलेंडर ऑर्डर करू शकणार आहेत.


सध्या ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना एचपी नव्या 10 किलो कंपोझिट एलपीजी सिलेंडर आणि 5 किलो मेटल सिलेंडर उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ही सुविधा इतर शहरांमध्येही सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. ( LPG Cylinder Delivery)



एचपी नव्या सिलेंडरची वैशिष्ट्ये



  • पारंपरिक सिलेंडरपेक्षा वजनाने हलका

  • गंज-प्रतिरोधक (Rust Resistant)


ही सेवा विशेषतः लहान कुटुंबे, विद्यार्थी, नोकरदार आणि अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, नवीन सिलेंडर खरेदी करण्यासाठी आधीपासून एलपीजी कनेक्शन असणे आवश्यक नाही. ( Instamart)



रिफिलची सुविधाही उपलब्ध


पहिली ऑर्डर नवीन कनेक्शन म्हणून गणली जाईल. त्यानंतर ग्राहक रिकामा एचपीसीएल सिलेंडर परत करून रिफिल मागवू शकतील. सिलेंडरची डिलिव्हरी अधिकृत एचपीसीएल वितरक आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.


कंपनीच्या मते, या उपक्रमामुळे एलपीजी सिलेंडर खरेदी आणि रिफिलची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर होणार आहे. (India News)

Comments
Add Comment

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या