Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दिमतीला सज्ज होणार ४ हजार ३०० कुशल तरुण!

कौशल्य विकास विभागाचा निर्णय; जागतिक युवा कौशल्य दिनी 'महाराष्ट्राचा स्किल फर्स्ट' पॅटर्न जाहीर


मुंबई : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी आणि सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यासाठी तब्बल ४ हजार उमेदवारांना पूर्वकौशल्य ज्ञान आणि ३०० उमेदवारांच्या अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मुंबईत आयोजित विशेष सोहळ्यात या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली. या योजनेमुळे हॉस्पिटॅलिटी, रिटेल, ऑटोमोबाईल, बांधकाम, आरोग्य सेवा आणि पर्यटन अशा प्रमुख क्षेत्रांसाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची मोठी फळी कुंभमेळ्यासाठी सज्ज होणार आहे. (Nashik Kumbh Mela)



एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलच्या सेंट्रल हॉलमध्ये बुधवारी पार पडलेल्या या सोहळ्याला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. कुंभमेळ्यासारख्या जागतिक दर्जाच्या महासोहळ्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (नाशिक) यांना ४ हजार ३०० उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठीचे इरादा पत्र या प्रसंगी प्रदान करण्यात आले. त्याशिवाय राज्यातील तरुणांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. 'सिड' संस्थेने '२ कॉम्स कन्सल्टिंग', 'बॉर्डर प्लस टेक्नॉलॉजी' आणि 'क्वेस इंटरनॅशनल सर्व्हिसेस' या जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. या करारांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणारे भाषा प्रशिक्षण, प्रस्थानपूर्व प्रशिक्षण, व्हिसा व कागदपत्रांची पूर्तता, तसेच थेट प्लेसमेंटनंतरचे सर्व सहकार्य मिळणार आहे. (Nashik Kumbh Mela)



तसेच, जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने चालणाऱ्या 'दक्ष' प्रकल्पांतर्गत आयटीआयमधील निदेशकांसाठीच्या आधुनिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४० आयटीआय शिक्षकांना अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही), सीएनसी मशीनिंग, रोबोटिक्स आणि एरोनॉटिकल फिटर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. याकामी 'महिंद्रा अँड महिंद्रा' आणि 'लार्सन अँड टुब्रो' या नामांकित उद्योगांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.




शांघाय 'वर्ल्ड स्किल्स'मधील विजेत्यांना ५ लाखांचे बक्षीस


चीनमधील शांघाय येथे आयोजित 'वर्ल्ड स्किल २०२६' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील पाच राष्ट्रीय विजेत्यांचा यावेळी रोख पारितोषिक देऊन विशेष गौरव करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवल्यास ५ लाख रुपये, रौप्य पदकासाठी ३ लाख आणि कांस्य पदकासाठी २ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

Comments
Add Comment

Nashik : कुंभमेळा पर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर सुरूच राहणार, शाहिस्नानानंतर साधू-संतांना दर्शनात अडथळा नाही - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्व काळात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय

Nashik News : श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला ! दानपेट्यांमध्ये 'इतके' लाख जमा

Nashik News : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध श्री कपालेश्वर महादेव मंदिरात (Kapaleshwar Temple) भाविकांनी

Vaishya Vani Community : वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मंत्री अतुल सावे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत