Wednesday, July 15, 2026

Mumbai Crime Branch : मुंबईत बनावट दुधाचा मोठा भांडाफोड; ५७५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

Mumbai Crime Branch : मुंबईत बनावट दुधाचा मोठा भांडाफोड; ५७५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

गोरेगाव पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, दोघांना अटक

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने गोरेगाव (Goregaon) पश्चिम येथे भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५७५ लिटर भेसळयुक्त दूध, दूध पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मालाची एकूण किंमत ७०,४०४ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर, लिंक रोडवरील अंकुर बिल्डिंगमध्ये आरोपी नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमधील शुद्ध दूध काढून त्यात पाणी मिसळत होते. त्यानंतर त्या पिशव्या पुन्हा सील करून हे भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात होते. (Goregaon)

या प्रकाराची गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा, कांदिवलीला मिळाल्यानंतर १५ जुलै २०२६ रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांसह संयुक्त छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी प्रत्यक्ष दूधाच्या पिशव्या उघडून त्यात पाणी मिसळत आणि पुन्हा सील करताना रंगेहाथ पकडले गेले. (Mumbai Police)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

या कारवाईत ५७५ लिटर भेसळयुक्त दूध (Fake Milk), २२४ रिकाम्या दुधाच्या पिशव्या, दूध पॅकिंग व सीलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, भेसळयुक्त दूध नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकते. हा अवैध व्यवसाय किती दिवसांपासून सुरू होता आणि हे दूध मुंबईतील कोणकोणत्या भागात पुरवले जात होते, याचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा