Weather Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट': पुढचे १० तास देशासाठी धोक्याचे! जाणून घ्या महाराष्ट्राचा अंदाज काय ?

देशातील हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) अत्यंत धोक्याचा इशारा दिला आहे. ताज्या माहितीनुसार, येत्या १० तासांत देशातील तब्बल १५ राज्यांमध्ये पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळू शकतो. या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासोबतच ताशी ६० किलोमीटर वेगाने भयंकर वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच, समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनाही प्रशासनाकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे.



कुठे कोसळणार मुसळधार? 'या' राज्यांना सर्वाधिक धोका


पुढील दहा तासांत विशेषतः उत्तर आणि पूर्व भारतात ढगफुटीसदृश पावसाचा जोर पाहायला मिळेल. हवामान खात्याने खालील राज्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे:


उत्तर आणि वायव्य भारत: दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान.


मध्य आणि पूर्व भारत: मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल.


ईशान्य भारत: सिक्कीम, आसाम, मेघालय आणि मणिपूर. या राज्यांमध्ये अचानक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागतील, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे.



महाराष्ट्रातील स्थिती: बळीराजावर दुबार पेरणीचे अस्मानी संकट



एकीकडे देशात मुसळधार पावसाची शक्यता असताना, महाराष्ट्रात मात्र पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्याला झोडपून काढणाऱ्या आणि अनेक ठिकाणी पूर आणणाऱ्या पावसाने, दुसऱ्या आठवड्यात मात्र अचानक विश्रांती घेतली. गेल्या आठवडाभरापासून पावसाचा थेंबही न पडल्याने तापमानात वाढ झाली असून, पावसाअभावी कोवळी पिके करपू लागली आहेत. ऐन खरिपाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने, हजारो रुपये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया जाण्याच्या भीतीने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.



राज्याला दिलासा! २० जुलैपासून पावसाचे दमदार पुनरागमन


शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. २० तारखेपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल आणि अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावेल. त्यामुळे, शेतकऱ्यांनी धीर न सोडता थोडी वाट पाहावी, असा आशावाद या हवामान अंदाजामधून निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.