Nashik Crime News : पाकिस्तानी नेक्सससोबतच नाशिकमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचेही समर्थक ! एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या (Shehzad Bhatti)  सोशल मीडिया नेक्सस प्रकरणात नाशिक एटीएसच्या तपासातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या २१ संशयितांपैकी ५ ते ६ तरुण हे केवळ शहजाद भट्टीशी (Shehzad Bhatti) संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सच नव्हे, तर कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang) सोशल मीडिया हँडल्सनाही फॉलो करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. (Nashik Crime News)



कारवाईने संभाव्य धोका टळला


प्राथमिक तपासात या तरुणांचा कोणत्याही गुन्हेगारी कारवाईत प्रत्यक्ष सहभाग आढळलेला नसला, तरी त्यांच्या मोबाईलमधील डिजिटल डेटा, व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp chat) आणि इतर मेसेंजर ॲप्सची एटीएसकडून (ATS) सखोल तपासणी सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे तरुण आंतरराष्ट्रीय देशविघातक नेक्ससमध्ये अडकण्याच्या उंबरठ्यावर होते. मात्र, एटीएसने वेळेत कारवाई केल्याने संभाव्य धोका टळल्याचे सांगितले जात आहे. कसून चौकशी केल्यानंतर २१ पैकी १५ संशयितांचा थेट देशविघातक कारवायांशी संबंध आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. उर्वरित संशयितांच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांची आणि ऑनलाइन संवादांची तपासणी सुरू आहे.  (Nashik Crime News)



बेरोजगारी आणि नैराश्यामुळे...


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले बहुतांश तरुण हे सुशिक्षित बेरोजगार (Educated unemployed) असून ते सराईत गुन्हेगार नाहीत. बेरोजगारी आणि नैराश्याच्या पार्श्वभूमीवर ते सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात आले होते. योग्य वेळी हस्तक्षेप झाल्याने हे तरुण कट्टरतेच्या आणि देशविघातक प्रवाहाच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यात यश आल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे. (Nashik Crime News)



यापूर्वीच्या तपासात शहजाद भट्टी (Shehzad Bhatti)  हा दुबईतून 'डोगर गँग'च्या मदतीने फेसबुक (Facebook) , इन्स्टाग्राम (Instagram) आणि टेलिग्रामच्या (Telegram) माध्यमातून भारतीय तरुणांचे ब्रेनवॉश करत असल्याची माहिती समोर आली होती. देशातील काही राज्यांमध्ये या नेटवर्कशी संबंधित संशयितांना पेट्रोल बॉम्ब हल्ले आणि व्हीआयपींची रेकी करण्यासारखी कामे देण्यात आल्याचाही तपासात उल्लेख आहे. मात्र, नाशिक परिक्षेत्रातील ताब्यात घेतलेल्या २१ संशयितांना अद्याप कोणत्याही प्रकारचे 'टेरर टास्क' (Terror Task) किंवा रेकीचे आदेश देण्यात आल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत. एटीएसच्या सतर्क कारवाईमुळे मोठा सुरक्षा धोका टळल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा बांकीपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय

बांकीपूर : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत जन

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या घटनादुरुस्तीचे पुरावे सादर करा!

- केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र; वैध प्रस्ताव अथवा ठराव अद्याप प्राप्त नाहीत मुंबई :

Akhilesh Reddy : मॅच फिक्सिंग प्रकरणात अमेरिकन क्रिकेटपटूला ICCचा दणका! अखिलेश रेड्डीवर तब्बल ८ वर्षांची बंदी

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता

Pune Rain : पुणेकरांनो सावध व्हा! मुठा नदीने धारण केले रौद्ररूप; धरण साखळी पूर्ण भरली, सखल भागात सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम

NDA Mangal Milan : एनडीएची मंगल मिलन बैठक मंगळवार ४ ऑगस्ट रोजी होणार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवार ३ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. निवडक