आयफोनमध्येच लपलेत PDF बनवण्याचे ३ सोपे मार्ग
तुम्हाला माहीत आहे का? आपल्या मोबाईलमध्ये एखादी फाईल किंवा फोटो पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण उगाचच प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून नवनवीन थर्ड-पार्टी ॲप्स डाऊनलोड करतो. पण जर तुमच्याकडे आयफोन असेल, तर तुम्हाला कोणत्याही बाहेरील ॲपची अजिबात गरज नाही! हो, तुमच्या आयफोनमध्येच पीडीएफ बनवण्याचे ३ अतिशय सोपे आणि छुपे मार्ग लपलेले आहेत.
"पहिली ट्रिक- जर तुम्हाला तुमच्या गॅलरीमधील फोटोंना पीडीएफ बनवून पाठवायचे असेल, तर ते अगदी चुटकीसरशी होतं. तुम्हाला जे फोटो पीडीएफ मध्ये हवे आहेत, ते गॅलरीमध्ये जाऊन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली दिलेल्या 'Share' बटनवर टॅप करा आणि खाली स्क्रोल करून 'Print' चा पर्याय निवडा. आता वरच्या कोपऱ्यात पुन्हा एक 'Share' आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करून 'Save to Files' वर क्लिक करा. बस्स! हवं तर तुम्ही या पीडीएफला नवीन नावही देऊ शकता आणि तुमची पीडीएफ फाईल्स ॲपमध्ये सुरक्षित सेव्ह होईल!"
दुसरी ट्रिक- जर तुमचे फोटो किंवा डॉक्युमेंट्स आधीपासूनच आयफोनच्या 'Files' ॲपमध्ये असतील, तर तिथेही हाच नियम लागू होतो.
फाईल्स ॲप उघडा, तुम्हाला हवे असलेले डॉक्युमेंट्स सिलेक्ट करा, त्यानंतर खाली डाव्या कोपऱ्यातील 'Share' आयकॉनवर टॅप करून 'Print' हा पर्याय निवडा. पुन्हा वरच्या 'Share' आयकॉनवर क्लिक करताच ती फाईल पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट होईल. आता तुम्ही ती थेट कोणालाही पाठवू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता."
आणि तिसरी ट्रिक, जी या दोन्हीपेक्षा सर्वात जास्त सोपी आणि फास्ट आहे! यासाठी फाईल्स ॲपमध्ये जा, तुमचे डॉक्युमेंट्स सिलेक्ट करा. आता उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात जे ३ डॉट्स दिसतात, त्यावर टॅप करा. तिथे तुम्हाला 'Quick Actions' चा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि थेट 'Create PDF' वर टॅप करा! जादू झाल्यासारखी तुमची पीडीएफ फाईल एका सेकंदात तिथेच तयार होईल.


