सावळघाटात भीषण अपघात; महिलेसह चार जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

नाशिक : नाशिक–पेठ मार्गावरील सावळघाटात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव ट्रक आणि मारुती इको कार यांच्यात झालेल्या या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता मारुती इको कार (जीजे-१५-सीआर-५६५९) नाशिकहून पेठकडे जात होती. सावळघाटातील तीव्र उतारावर असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे (एमएच-०४-जीएफ-८९०१) ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला ट्रक वेगाने इको कारवर आदळला.

या धडकेमुळे इको कार समोरील अवजड ट्रकला (एनएल-०१-एसी-१९२९) जाऊन धडकली. दोन ट्रकांच्या मध्ये कार अडकल्याने तिचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात कारमधील एक महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यापैकी एका जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या चारवर पोहोचली असून, आणखी एक जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अपघाताची माहिती मिळताच पेठ आणि दिंडोरी पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पेठ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.दरम्यान, अपघातानंतर सावळघाटात दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात
Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस थेट विमान सेवा

नवी मुंबई विमानतळ : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NHIA)

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Russia Ukraine War : इराण-अमेरिका संघर्षाच्या छायेत रशियाचा महाविनाशक प्रहार, युक्रेनवर ३ टनांच्या FAB-३००० ग्लाईड बॉम्बचा हल्ला

रशिया : रशिया-युक्रेन युद्धाने आता अधिक भीषण आणि रक्तरंजित वळण घेतले आहे. युक्रेनकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना

Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला ठोठावली ३ लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांना त्यांच्या 'इंडियाज गॉट लेटंट'(India's Got Latent)

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक