Vinayak Raut : विनायक राऊत प्रकरणाला नवे वळण! अटकपूर्व जामिनासाठी धाव, भोंदूबाबा अटकेत; सूनेच्या आरोपांनी खळबळ

मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील कौटुंबिक छळ व जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याला नवे वळण मिळाले आहे. सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबीयांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, या अर्जावर २३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत विनायक राऊत आणि गितेश राऊत यांची पोलिसांकडून चौकशी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. (Vinayak Raut)



कथित भोंदूबाबा फिरोज शेखला २ दिवसांची पोलीस कोठडी :


गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश आणि अन्य मिळून सात जणांविरोधात कौटुंबिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कथित भोंदूबाबा फिरोज शेख याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आणखी दोन भोंदूबाबांचा पोलीस शोध घेत आहेत. (Vinayak Raut)



सूनेचे गंभीर आरोप :


गिरीजा राऊत यांनी तक्रारीत वैवाहिक आयुष्यात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर हनिमूनसाठी ऊटीला गेल्यानंतर पती गितेश राऊत यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली, सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली आणि वारंवार मानसिक त्रास दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, वैवाहिक आयुष्यातील समस्यांवर उपाय म्हणून अघोरी विधी आणि जादूटोण्याचा आधार घेतल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांच्या आधारे पोलिसांनी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Vinayak Raut)



'फक्त परदेशातच शारीरिक संबंध'चा धक्कादायक दावा :


तक्रारीत गिरीजा राऊत यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, विरोध केल्यास मारहाण केली आणि "मी फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सवरच शारीरिक संबंध ठेवू शकतो" असे सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दाव्यांमुळे संपूर्ण प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Vinayak Raut)



विनायक राऊतांनी आरोप फेटाळले :


दरम्यान, विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, गिरीजा आणि गितेश गेली तीन वर्षे वेगळे राहत असून, घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. २०१८ मधील कथित घटनांची तक्रार २०२६ मध्ये करण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला.


सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, २३ जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Comments
Add Comment

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये

Mumbai Smart Turf Policy : मुंबईत महापालिकेद्वारे 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण?

- खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार बुकिंग आणि विषारी रबर कणांवर येणार बंदी. - भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांची

Plastic Bottle Ban : मुंबई महापालिका सर्व कार्यालयांमध्ये पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सला बंदी

- महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख कार्यालये व

BMC News : दादर फुल बाजारमधील टाकाऊ फुलांच्या विल्हेवाटीसाठी अद्यायावत तंत्रज्ञान वापरा

- अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतनिधी) टाकाऊ फुलांची विल्हेवाट

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट