BMC : मुंबईत बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकणाऱ्यांना बसणार चाप

- सचिन धानजी



महापालिका विकसित करणार 'एकात्मिक बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल'


दिल्लीत यशस्वी प्रयोग करणाऱ्या संस्थेची निवड


मुंबई : मुंबई शहरात वेगाने सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प, रस्ते काँक्रीटीकरण, पुनर्विकास आणि शासकीय व खासगी बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या बांधकाम व पाडकाम कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा मुंबई महानगरपालिकेसमोरील मोठा पेच बनला आहे. या पार्श्वभूमीवर, अनधिकृतपणे डेब्रिज टाकणे आणि बेकायदेशीर वाहतुकीमुळे होणारे वायू व धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका 'एकात्मिक बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल' विकसित करणार आहे. यासाठी ट्रेस रिसोर्स मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे.



उच्च न्यायालय आणि मुख्य सचिवांचे निर्देश


बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम, २०२५ आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील वायू आणि धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. तसेच ८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही या कचऱ्याच्या संकलनापासून ते विल्हेवाटीपर्यंत डिजिटल देखरेख यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालिकेने हे पाऊल उचलले आहे.



ऑटो डीसीआर आणि जीपीएस प्रणालीशी जोडणी हे पोर्टल केवळ माहिती संकलित करणार नसून ते मुंबई पालिकेच्या बांधकाम मंजुरी देणाऱ्या 'ऑटो डीसीआर' प्रणालीशी थेट जोडले जाईल. यामुळे कोणत्या बांधकामातून किती कचरा निघणार याचा अंदाज आधीच येईल. याशिवाय डेब्रिज वाहून नेणाऱ्या वाहनांवर 'जीपीएस व्हीटीएमएस' आधारित वाहन नियंत्रण यंत्रणा असेल. त्यामुळे कचरा ठरवून दिलेल्या अधिकृत डम्पिंग स्थळांवर न टाकता वाटेतच कुठेही बेकायदेशीरपणे ओतल्यास त्याची त्वरित माहिती नियंत्रण कक्षाला मिळेल.


यासाठी ट्रेस रिसोर्स मॅनेजमेंट प्रा. लि. ही एकच संस्था पात्र ठरली असून या संस्थेने यापूर्वी दिल्ली महानगरपालिकेसाठी 'दिल्ली मालबे' नावाचे अशाच प्रकारचे एकात्मिक पोर्टल यशस्वीरीत्या विकसित केले आहे. या साठी सुमारे १ कोटी ११ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे.फक्त मे या संस्थेने यापूर्वी दिल्ली महानगरपालिकेसाठी दिल्ली मालबे' नावाचे अशाच प्रकारचे एकात्मिक पोर्टल यशस्वीरीत्या विकसित केले आहे.



पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये



  • जीपीएस आधारित ट्रॅकिंग: डेब्रिज वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनावर डिजिटल लक्ष ठेवले जाईल.

  • जिओ फेन्सिंग : कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या ठरवून दिलेल्या मार्गावरूनच जात आहेत की नाही, हे तपासले जाईल.

  • ऑटो डीसीआर एकत्रीकरण: बांधकाम मंजुरी आणि कचरा व्यवस्थापन योजनेची सांगड घातली जाईल.

  • पर्यावरण नियंत्रण: बेकायदेशीरपणे कचरा टाकण्यास अटकाव करून धूळ व वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये

Mumbai Smart Turf Policy : मुंबईत महापालिकेद्वारे 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण?

- खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार बुकिंग आणि विषारी रबर कणांवर येणार बंदी. - भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांची