Bangkok Bar Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; बारला आग लागून २७ जणांचा मृत्यू

बँकॉक  : थायलंडची राजधानी बँकॉक (Bangkok) येथे रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री एका बारमध्ये (Bar) भीषण आग (Fire) लागून २७ जणांचा मृत्यू झाला, तर ६३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीमागील कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.


उत्तर बँकॉकमधील ना लाडप्राओ पब (Na Ladprao Pub) येथे ही दुर्घटना घडली. प्रवेशद्वाराजवळ अचानक आग लागल्यानंतर काही क्षणांतच दाट धूर संपूर्ण इमारतीत पसरला. जीव वाचवण्यासाठी लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र धुरामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाने सुमारे ३० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.







बँकॉकचे राज्यपाल चॅडचार्ट सिट्टीपुंट यांनी सांगितले की, आग अतिशय वेगाने छतापर्यंत पसरली आणि दाट धूर हेच मृत्यूचे मुख्य कारण असण्याची शक्यता आहे. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून ६३ जणांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी २२ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


प्राथमिक तपासात अनेक मृतदेह फायर एक्झिट (Fire Exit) जवळ आढळून आले. बाहेर पडण्याचा मार्ग अडथळ्यांमुळे बंद झाला होता का, याची चौकशी केली जात आहे. घटनेच्या वेळी बारमध्ये नेमके किती लोक उपस्थित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


थायलंडचे पंतप्रधान अनुटिन चार्नवीराकुल यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, बारमध्ये सादरीकरण करणाऱ्या एका संगीतकाराने स्टेजजवळील सर्किट ब्रेकर (Circuit Breaker) मधून धूर येताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला, मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण बार धुराने भरून गेला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बारच्या मागील बाजूला असलेल्या शौचालयाजवळ अनेक मृतदेह आढळले. अंधार आणि दाट धुरामुळे लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



दरम्यान, या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये बारमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडताना आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. आग विझवल्यानंतर बारच्या आतील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का, याचा तपास (Investigation) संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक