लंडन : इंग्लंड महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार हिथर नाइट हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेला एकमेव कसोटी सामना तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरणार आहे. लॉर्ड्सवरील हा महिला दोन्हीही संघांमधील पहिलाच कसोटी सामना असून, या ऐतिहासिक लढतीनंतर हिथर नाइट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार आहे.
मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. दरड कोसळल्याने ...
नाइटने २०१९ साली इंग्लंडकडून पदार्पण केले होते. तब्बल 16 वर्षांच्या कारकिर्दीत नाइटने संघासाठी तिन्हीही फॉर्मेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तिन्ही फॉर्मेट मिळून नाइटने इंग्लंडसाठी ३२० आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. यात तिने ७,९८८ धावा करत सहा शतके झळकावले आहेत. टी-२० विश्वचषक २०२० मध्ये तिने विक्रमी शकत करत इंग्लंडसाठी तिन्हीही फॉर्मेटमध्ये शतक करण्याचा मान मिळवला आहे. नाइटने २०१६ ते २०२५ या कलावधीत नाइटच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली होती. तिच्या नेतृत्वातखाली संघाने १९९ सामन्यात १३४ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहे. विशेष म्हणजे, २०१७ च्या महिला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव करून इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका होती. (Ind Vs Eng)
Saying goodbye to another legend of our game 😢 pic.twitter.com/pVoNiRCkCo
— England Cricket (@englandcricket) July 11, 2026
निवृत्तीची घोषणा करताना नाइट म्हणाली, इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा निर्णय भावनिक असला तरी योग्य वेळी घेतला जात आहे. आता आयुष्यातील नव्या पर्वासाठी मी उत्सुक आहे. दरम्यान, लॉर्ड्स कसोटीत भारताने पहिल्या डावात २८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव १७० धावांवर आटोपला असून, भारताने दुसऱ्या डावात एक विकेट गमावत १५४ धावा केल्या आहेत.






