हिवाळी अधिवेशनाआधी ५ आमदार निवृत्त होणार; पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लक्ष
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले असतानाच, आगामी हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांना आणखी एक धक्का बसणार आहे. विधान परिषदेतील ५ आमदारांचा कार्यकाळ येत्या ६ डिसेंबर रोजी संपणार असून, ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच हे आमदार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. या ५ आमदारांपैकी ४ सदस्य विरोधी पक्षांचे असल्याने आगामी काळात वरिष्ठ सभागृहातील विरोधकांची ताकद कमी होणार असून, रिक्त होणाऱ्या या जागांसाठी नोव्हेंबर महिन्यात संभाव्य असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये विरोधी बाकांवरील ४ आणि सत्ताधारी बाकांवरील (सहयोगी) १ अशा पाच आमदारांचा समावेश आहे. यामध्ये
Crime News : २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; एक्स गर्लफ्रेंडचा कॉल आला आणि....
रायपूर : रायपूर मधील छत्तीसगडच्या भिलाईत परिसरात बुधवारी(Wednesday) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शादाब शेख (१९ वय) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ...
">छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार अरुण लाड, आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी या तीन बड्या नेत्यांची मुदत संपत आहे. त्यांच्या जोडीलाच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील अपक्ष आमदार किरण सरनाईक हे देखील निवृत्त होत आहेत. या पाचही सदस्यांनी आपल्या कार्यकाळात विधान परिषदेत शिक्षण, सहकार, शेती आणि विविध सामाजिक प्रश्नांवर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत सभागृहाचा दर्जा उंचावला होता.
Vietnam Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाम बोट दुर्घटनेत २१ जणांना वाचवण्यात यश, १५ भारतीयांचा मृत्यू; दूतावासाकडून तातडीची मदत
व्हिएतनाम : व्हिएतनाममधील (Vietnam boat accident)अतिशय लोकप्रिय अशा 'फू क्वोक' (Phu Quoc) बेटाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांवर मोठा अनर्थ ओढवला आहे. एका भीषण दुर्घटनेत ...
Crime News : २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; एक्स गर्लफ्रेंडचा कॉल आला आणि....
रायपूर : रायपूर मधील छत्तीसगडच्या भिलाईत परिसरात बुधवारी(Wednesday) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शादाब शेख (१९ वय) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ...
पावसाळी अधिवेशनाच्या सांगता दिनी या पाचही सदस्यांना विधिमंडळात निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही सभागृहातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या आमदारांनी संसदीय कामकाजात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रिक्त होणाऱ्या या जागांवर पुन्हा आपले वर्चस्व राखण्यासाठी आणि विरोधकांना खिंडीत गाठण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.