मध्यरात्री मिरा रोडवर थरार! मीटर बॉक्सला भीषण आग; धुराच्या कोंडीत अडकलेल्या १०४ रहिवाशांची सुखरूप सुटका

मुंबई : मिरा रोड पूर्व येथील एका निवासी इमारतीत मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना टळली. सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले. या धुराच्या कोंडीत तब्बल १०४ रहिवासी अडकले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.ही घटना गोविंद नगर (पार्श्वनगर) परिसरातील 'अक्वारिया' टॉवरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली. रात्री सुमारे १.३३ वाजता तळमजल्यावरील मीटर बॉक्समधून अचानक आगीच्या ज्वाळा उसळल्या. काही क्षणांतच इमारतीत दाट धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.



धुरामुळे रहिवाशांमध्ये घबराट


बहुतांश रहिवासी गाढ झोपेत असताना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अनेकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र जिना धुराने भरल्याने अनेक जण इमारतीतच अडकून पडले. परिस्थिती गंभीर होताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.



अग्निशमन दलाची शर्थीची बचावमोहीम


घटनेची माहिती मिळताच सिल्व्हर पार्क आणि स्व. कल्पना चावला अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी एका बाजूने आगीवर नियंत्रण मिळवले, तर दुसऱ्या बाजूने धुराच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांसह सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या जलद आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.



२१ जण रुग्णालयात; प्रकृती स्थिर


धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या २१ रहिवाशांना उपचारासाठी परिसरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.



विद्युत वायर जळाल्या, तपास सुरू


या आगीत महावितरणच्या सुमारे २२ ते २५ मीटर लांबीच्या विद्युत तारा जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत निवासी इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणा आणि विद्युत व्यवस्थेची नियमित तपासणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Crane Accident : कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळली; तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि