Nitesh Rane : राम मंदिरावरच आंदोलन मग कथित हज घोटाळ्यावर मौन का ? मंत्री राणे यांचा उबाठावर घणाघात

शिर्डी  : राम मंदिराच्या नावाने रान उठवणाऱ्यांची जीभ कथित हज घोटाळा किंवा इतर धार्मिक संस्थांतील कथित गैरव्यवहारांवर का बंद होते ? असा थेट सवाल करत राज्याचे मस्त्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी शिर्डीतून शिवसेना (उबाठा) गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. अभिनेता आमिर खान यांच्यावर "लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर" असल्याचा आरोप करत हिंदूंनी त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा असे आवाहन त्यांनी केले. तर खासदार संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका करत राज्याच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी टाकली.





दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी शनिवार दि. ११ रोजी मातोश्री निलमताई राणे (Nilamtai Rane) यांच्या समवेत श्री साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंत्री नितेश राणे यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांच्या हस्ते साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक प्रहार चे मुख्य लेखाधीकारी ज्ञानेश सावंत, पोपट शिंदे आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. साई दर्शनासाठी मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. आमिर खान यांच्या तिसऱ्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आमिर खान यांच्यावर "लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर" असल्याचा आरोप केला. हिंदू समाजातील तरुणांनी त्यांच्या चित्रपटांकडे पाठ फिरवावी असे आवाहनही त्यांनी केले.





राम मंदिर दान प्रकरणावर आंदोलन करणाऱ्यांवर निशाणा साधताना ना.राणे म्हणाले की, राम मंदिराच्या नावाने आक्रोश करणारे मशिदींतील कथित गैरव्यवहार किंवा कथित हज घोटाळ्याबाबत मात्र गप्प का बसतात ? एका धार्मिक संस्थेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वच धर्मांतील कथित गैरप्रकाराबाबत समान भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी शिवसेना (उबाठा) गटावरही अप्रत्यक्ष टीका करत राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले. खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत मंत्री नितेश राणे म्हणाले, पूर्वी मातोश्रीत काड्या लावणारे आज भाजपमध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्यांचा मालक साधा ग्रामपंचायतीचा सरपंचदेखील होऊ शकत नाही, ते आज इतरांना राजकारणाचे धडे देत आहेत.अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील