Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन

पुणे : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर (Temple) येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन (Darshan) घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन (Worship) करण्यात आले.


मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार (Felicitation) करण्यात आला. यावेळी त्यांनी आषाढी वारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना (Warkaris) शुभेच्छा देत त्यांच्या प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.



या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे तसेच पालखी विठ्ठल मंदिर संस्थेचे विश्वस्त (Trustees) उपस्थित होते.


मंदिर परिसरात मोठ्या संख्येने वारकरी (Warkaris) आणि भाविक (Devotees) उपस्थित होते. गुरुवारी विठ्ठल नामाच्या गजरासह 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या (Cymbals and Mridanga) तालावर भक्तिमय वातावरणात (Devotional Atmosphere) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पालखी विठ्ठल मंदिरात आगमन झाले.

Comments
Add Comment

Pune Rain : पुणेकरांनो सावध व्हा! मुठा नदीने धारण केले रौद्ररूप; धरण साखळी पूर्ण भरली, सखल भागात सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम

Khopoli Accident : ५० फूट खोल दरीत कोसळली भरधाव कार झाडात अडकली, अन् पुढच्याच क्षणी...खोपोलीत थरारक घटना!

खोपोली : खोपोलीतील गारमाळ रस्त्यावर सोमवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार

Kolhapur : आरोपी फरार; कोल्हापुरातील बाळूमामांच्या मंदिरात ६० कोटींचा घोटाळा

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध संत बाळूमामा मंदिरात तब्बल ६०

Private Vehicle Police Sticker : खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहून चमकोगिरी करणे महागात पडणार

- विशेष तपासणी करून कारवाई होणार; वाहतूक विभागाचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र मुंबई : आपल्या खासगी

Women Heart Attack Video : 'अचानक छातीत दुखू लागलं... अन् पुढच्या 5 मिनिटांत जे घडलं ते थक्क करणारं! Video Viral

पुणे बसस्थानकावर महिलेला हार्ट अटॅक; महिला कंडक्टर बनली देवदूत पुणे: पुण्यातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकावर एक

Maharashtra Karjmafi 2026 : ४ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ७ हजार कोटी जमा होणार

मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र ठरलेल्या