Khopoli Accident : ५० फूट खोल दरीत कोसळली भरधाव कार झाडात अडकली, अन् पुढच्याच क्षणी...खोपोलीत थरारक घटना!

खोपोली : खोपोलीतील गारमाळ रस्त्यावर सोमवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट ५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने ही कार एका झाडामध्ये जाऊन अडकली आणि एक मोठा अनर्थ टळला. कार झाडात अडकल्यामुळे चालकाचा जीव थोडक्यात वाचला आहे.



झाड ठरले देवदूत, चालकाला स्थानिकांनी काढले बाहेर!




सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कार झाडाच्या फांद्यांमध्ये लटकलेली दिसत असून, ती खाली कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि चालकाला सुखरूप बाहेर काढले. जर ती कार झाडात अडकली नसती, तर ती थेट खाली असणाऱ्या 'मिसिंग लिंक'च्या रस्त्यावर कोसळली असती. हा अपघात नक्की कसा झाला, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.



रील्स बनवताना पर्यटक दरीत कोसळला


खोपोलीतच घडलेल्या दुसऱ्या एका दुर्दैवी घटनेत एका २३ वर्षांच्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला. रविवारी पावसाळी हवामानाचा आनंद घेण्यासाठी चार मित्र खोपोलीतील प्रसिद्ध डीपी धबधब्यावर (DP Waterfall) आले होते. तेथे व्हिडिओ (Reels) बनवत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि अभिषेक कुशवाह (वय २३) हा तरुण तोल जाऊन पाण्यात पडला व दरीत वाहून गेला.



शोधमोहीम अन् मृतदेह हाती


मित्र अचानक गायब झाल्याने घाबरलेल्या त्याच्या तीन सहकाऱ्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. खोपोली पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, रविवारी रात्री अंधार पडल्यामुळे आणि पावसामुळे मोहीम थांबवावी लागली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी ५:३३ च्या सुमारास पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आणि सकाळी ६ च्या सुमारास अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात त्याचे इतर तीन मित्र सुरक्षित आहेत.

Comments
Add Comment

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.