Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; दान केलेले सोन्याचे अलंकार तुम्ही पाहिलेत का ?

 Shirdi :  शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर लाखो भाविकांनी दर्शनासह साईबाबांच्या चरणी दान केले आहे. गुरूपौर्णिमा उत्सवात (Gurupuarnima) साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा भाविकांकडून दान करण्यात आली आहे.



दान केलेले सोन्याचे अलंकार


गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवशी (२८ जुलै) मध्यप्रदेश राज्‍यातील जबलपूर येथील साईभक्त ए. के. शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरणी ४८ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाची किंमत रुपये ६ लाख २८ हजार ७५२ इतकी आहे.



तर गुजरात राज्यातील वडोदरा येथील साईभक्त विजय बालकृष्ण नाईक यांनी श्री साईबाबांच्या चरणी २५.५३० ग्रॅम वजनाचे दोन आकर्षक सुवर्ण 'ॐ' अर्पण केले. या सुवर्ण 'ॐ'ची किंमत रुपये ३ लाख ३४ हजार ४१७ इतकी आहे.



गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवशी आंध्र प्रदेशातील साईभक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांनी साईबाबांना सुमारे एक कोटी रुपये मूल्याचा 642 ग्रॅम वजनाचा सूवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाची देणगी मुल्‍य सुमारे ८२ लाख ३९ हजार २७१ रुपये असून, या मुकुटावर अत्यंत आकर्षक नक्षीकाम करण्यात आलेले आहेत. त्यात सूर्य,चंद्र,नवग्रह,व्याल मूर्ती आणि नवरत्नांची सुंदर जडणघडण करण्यात आली आहे.



गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी मुंबईतील एका साईभक्ताने आपली ओळख गुप्त ठेवत जवळपास 300 ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे 47 लाख रुपये मूल्याचा सुवर्ण हार साईचरणी अर्पण केला. हे गुप्तदान असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानने दिली. या सुवर्ण हारामुळे गुरुपौर्णिमेच्या उत्सवात सुवर्णदानाची चर्चा अधिक रंगली.



उत्सवाच्या सांगता दिनीही सुवर्णदानाची परंपरा कायम राहिली. तामिळनाडूतील चेन्नई येथील साईभक्त आर. वेत्री सेल्वी अव्वल राज यांनी 32 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सुवर्ण साखळी साईबाबांच्या चरणी अर्पण केली. या सुवर्ण साखळीचे अंदाजे मूल्य 4 लाख 21 हजार रुपये असून, साईबाबांप्रती असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेचे हे प्रतीक मानले जात आहे.



तर गुरुपौर्णिमेच्या आधी म्हणजेच २६ जुलैला कर्नाटक राज्यातील उडपी येथील साईभक्त बी. चंद्रशेखर किनी यांनी श्री साईबाबांच्या चरणी श्री साईबाबा महाप्रसाद बनवतांनाची प्रतिमात्‍मक चांदीची मुर्ती अर्पण केली. सदर चांदीच्या मूर्तीचे एकूण वजन १ किलो २०४ ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत २ लाख १४ हजार ३१२ इतकी आहे.


Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार