Pradhan Mantri pik vima yojana : एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीक विमा योजनेची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढली

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri pik vima yojana) सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत ३१ जुलैवरून आता थेट १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharne) यांनी दिली. एल निनोमुळे (El Niño) हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


राज्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता किंवा इतर कारणांमुळे अर्ज करता आलेला नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळावी म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pradhan Mantri pik vima yojana)



कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, मराठवाडा विभागातून सर्वाधिक, तर कोकण विभागातून सर्वात कमी नोंदणी झाली आहे. विविध विभागांतील नोंदणी पुढीलप्रमाणे आहे – कोकण १.०२ लाख, नाशिक ३.३३ लाख, पुणे ६.०७ लाख, कोल्हापूर २.४० लाख, छत्रपती संभाजीनगर १३.२५ लाख, लातूर २.४२ लाख, अमरावती ६.९१ लाख आणि नागपूर ४.५३ लाख शेतकरी. (Pradhan Mantri pik vima yojana)


कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्टपूर्वी अर्ज पूर्ण करावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "राज्यातील एकही पात्र शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. वाढीव मुदतीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता अर्ज करावा." (Pradhan Mantri pik vima yojana)



प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट आणि हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देते. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (Pradhan Mantri pik vima yojana)


ऑनलाइन अर्जासाठी: शेतकरी PMFBY Crop Insurance App डाउनलोड करू शकतात किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. (Pradhan Mantri pik vima yojana)

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार