Chandrashekhar Bawankule : शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्याच्या बहाण्याने जमिनींच्या मालकी हक्कात फेरफार

महसूल खात्यात 'कलम १५५' चा गैरवापर; पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित



मुंबई : शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्याच्या बहाण्याने जमिनींच्या मालकी हक्कात फेरफार केल्याची बाब मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात निदर्शनास आली होती. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील 'कलम १५५' चा गैरवापर करून हा गैरव्यवहार करण्यात आला होता. त्याची दखल घेत, मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे करणाऱ्या आणि जमिनींचे फेरफार करणाऱ्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशाराही महसूलमंत्री बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.




उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी मागील अधिवेशनात महसूल अधिनियमाच्या कलम १५५ च्या गैरवापराबद्दल सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर पुणे विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सरकारने ही कारवाई केली. 'कलम १५५' चा वापर केवळ शुद्धलेखनाच्या किंवा लिपिकीय चुका दुरुस्त करण्यासाठी करणे अपेक्षित असते. मात्र, अधिकाऱ्यांनी याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनींच्या मालकी हक्कात फेरफार केले. एकाची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. काही प्रकरणांमध्ये तर पुरावे नष्ट करण्यासाठी संचिका (फायली) गायब करण्यात आल्या आहेत. या गायब संचिकांबाबत 'प्रशासकीय आणि सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५' नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.




एकाची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करण्याचा मोठा गैरव्यवहार यात झाला आहे. पुनरनिरीक्षण करून मूळ मालकांच्या जमिनी त्यांना परत (रिस्टोर) करण्याची मोठी प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. पुणे विभागाच्या चौकशीत एकूण ४२४ प्रकरणे संशयास्पद आढळली आहेत. त्यापैकी अतिगंभीर गटातील १३ प्रकरणांमध्ये थेट दोषी आढळलेल्या १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. गंभीर गटातील २४७ प्रकरणांमधील दोषींवर 'नियम ८' अंतर्गत जबर शिक्षेसाठी चौकशी सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर, किरकोळ गटातील १६४ प्रकरणांमध्ये 'नियम १०' अन्वये चौकशी होणार आहे. 'अ' वर्गातील ३० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या दोषींचे त्वरित निलंबन, तर 'ब' वर्गातील दोषींची पुणे विभागाबाहेर अकार्यकारी पदावर बदली होणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.




पुढील तीन महिन्यांत राज्यव्यापी पडताळणी





  • - महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, पुणे विभागातील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता संपूर्ण राज्यात मागील ५ वर्षांत 'कलम १५५' अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासाठी ३ महिन्यांची मुदत देण्यात आली असून, याचा 'अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट' पुढील अधिवेशनात मांडला जाईल.
    - अधिकारी वर्गाकडून कलम १५५ नव्हे, तर कलम ७० (ब) आणि कलम ८५ चाही गैरवापर केला जातो. या खालच्या अधिकाऱ्यांच्या अधिकारांना आव्हान देणे कठीण होते. त्यामुळे या तिन्ही कलमांमधील पळवाटा बंद करण्यासाठी कायदा सुधारणा समिती (लॉ ज्युडी) काम करत असून, पुढच्या अधिवेशनात महसूल कायद्यात मोठी दुरुस्ती विधेयक आणले जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली.
    - तुळजापूर येथील जमिनी बळकावणे आणि अतिक्रमणाच्या तक्रारीची दखल घेत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी मंत्र्यांच्या वतीने आश्वस्त करण्यात आले की, तेथील बेकायदेशीर अतिक्रमणे जमीनदोस्त केली जातील आणि संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर

Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने