Pavitra Rishta : 63 व्या वर्षीही अविवाहित, 'पवित्र रिश्ता' फेम 'ही' अभिनेत्री; सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण

Pavitra Rishta : पवित्र रिश्ता मालिका आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. मालिकेची कथा, पटकथा , अभिनय त्यासोबतच गाणे सर्व काही चाहत्यांच्या मनावर आजही राज करत आहे. मात्र तुम्हांला माहिती आहे का की या मालिकेतील एक अभिनेत्री आजही अविवाहित आहे. 'पवित्र रिश्ता' आणि 'कुमकुम भाग्य' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वाती आनंद (Swati Anand) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.



25 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये


63 वर्षांची झालेली स्वाती आजही अविवाहित आहे आणि विशेष म्हणजे हा तिचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. गेल्या तब्बल 25 वर्षांपासून ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असली तरी या नात्याबद्दल तिने कधीही सार्वजनिकरित्या बोलणं किंवा सोशल मीडियावर काही शेअर करणं पसंत केलं नाही. अलीकडेच 'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत स्वातीने लग्न न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. ती म्हणाली, "मला कधीच असं वाटलं नाही की मी लग्न करावं. अगदी लहानपणापासूनच मी आईला सांगायचे की, मी आयुष्यभर एकटीच राहणार. माझी आई मात्र माझं लग्न मोठ्या थाटामाटात करण्याचं स्वप्न पाहायची." ('Pavitra Rishta' fame Swati Anand)





'तो' प्रश्न कायम माझ्या मनात


ती पुढे म्हणाली, "मी मोठी होत गेले तसं माझे विचार घरच्यांनाही समजू लागले. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच भरपूर स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे लग्नानंतरही मला असंच स्वातंत्र्य मिळेल का, हा प्रश्न कायम माझ्या मनात होता." स्वातीने नातेसंबंधांबद्दलचे तिचे विचारही मांडले. "मी खूप भावूक स्वभावाची आहे. एखाद्या नात्यात मी शंभर टक्के देत असेन, तर समोरच्याकडून किमान अर्धी तरी साथ मिळावी, अशी अपेक्षा असणं चुकीचं नाही. माणूस असल्यामुळे अपेक्षा असतातच. काळानुसार अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचाही त्यावर परिणाम होतो," असं ती म्हणाली. ('Pavitra Rishta' fame Swati Anand)



लग्न न करण्यामागचं खरं कारण


लहानपणापासून घरात मिळालेलं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा लग्नानंतर मिळाला नाही तर काय, ही भीतीही तिला सतावत होती. याच कारणामुळे तिने लग्न न करण्याचा निर्णय कायम ठेवला, असंही तिने स्पष्ट केलं. लग्नावरून नातेवाईकांकडून अनेकदा टोमणे ऐकावे लागले, तरीही तिच्या निर्णयात कधी बदल झाला नाही. "मला कोणाशीच काही अडचण नव्हती. मी सर्वांसोबत सहज मिसळते. माझ्या आई-वडिलांनी कधीही माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला नाही. उलट त्यांनी माझा निर्णय समजून घेतला आणि त्याचा त्यांना कधीही पश्चात्ताप झाला नाही. ते माझ्या आनंदातच आनंदी आहेत," असं स्वाती आनंदने मुलाखतीत सांगितलं.

Comments
Add Comment

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका

Samadhan Sarvankar : 'बेबी सरवणकर'चे आगमन! तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर झाले आई-बाबा

मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर