TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होणार? गोकुळधाम सोसायटीच्या तोडफोडीच्या व्हिडिओने चाहत्यांमध्ये खळबळ

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही गेली १७ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटी हा सेट प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरला आहे. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.



गोकुळधाम सोसायटीच्या तोडफोडीने खळबळ


व्हिडीओमध्ये गोकुलधाम सोसायटीच्या सेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू असल्याचे दिसत आहे. चारही बाजूला मजूर काम करताना दिसत आहेत आणि संपूर्ण सेट लाकडी खांब आणि फळ्यांनी झाकलेला आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर फॅन्स खूप चिंताग्रस्त झाले आणि प्रश्न विचारू लागले की, गोकुळधाम सोसायटी कायमची बंद होत आहे का ? व्हिडीओ व्हायरल झाल्यावर फॅन्सनी वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली. कोणीतरी विचारले की सेट का तोडला जात आहे, शो बंद होणार आहे का? तर कुणीतरी म्हणाले की, आता गोकुळधामचा संपूर्ण सेट बदलणार आहे का? काहींनी तर गोकुळधामचा सेट कायमचा हटवला जात असल्याचा अंदाजही व्यक्त केला.  (Taarak Mehta Ka Ooltah Chashma)



असित कुमार मोदी यांनी सांगितले सत्य


दरम्यान, वाढत्या चर्चेनंतर मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, गोकुळधाम सोसायटीचा (Gokuldham Society) सेट हटवला जात नसून त्याचे नूतनीकरण सुरू आहे. असित मोदी म्हणाले, "जे काही सुरू आहे ते प्रेक्षकांच्या आनंदासाठीच आहे. गोकुळधाम सोसायटीला नव्या स्वरूपात साकारले जात आहे. काही दिवसांतच प्रेक्षकांना हा सेट पूर्णपणे नव्या लूकमध्ये पाहायला मिळेल." (Taarak Mehta Ka Ooltah Chashma)



गोकुळधाम सोसायटी लवकरच नव्या रूपात


सध्या असित मोदी स्वतः कामाची पाहणी करत असून अभियंते, सुपरवायझर आणि कामगारांशी चर्चा करून काम सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देताना दिसत आहेत. त्यामुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका बंद होणार नसून, गोकुळधाम सोसायटी लवकरच नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या या 17 वर्षांच्या दीर्घ प्रवासात अनेक कलाकारांनी शोला अलविदा केला, तर काही नवीन चेहऱ्यांनी आपली जागा निर्माण केली. पण एक गोष्ट आहे जी नेहमी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून ठेवते, ती म्हणजे गोकुळधाम सोसायटी. हीच ती जागा आहे, जिथे जेठालाल, भिडे, पोपटलाल, अय्यर, डॉ. हाथी आणि इतर सर्व पात्रांच्या नवनवीन कहाण्या जन्म घेतात. त्यामुळे हा सेट प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

Comments
Add Comment

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं