Monsoon Update : यंदाच्या पावसाळ्यात 1 जूनपासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस

रायगड जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंद


मुंबई : राज्यात मान्सून सक्रिय असून यंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.(Maharashtra Monsoon)



सकाळी 11 वाजेपर्यंत दिलेल्या प्राप्त माहितीनुसार मागील २४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पाऊस झाला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल ठाणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३७.२ मिमी, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ३२.४ मिमी, रत्नागिरीत ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या या समाधानकारक पावसामुळे मान्सूनची सक्रियता कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Monsoon Update)
Comments
Add Comment

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकर यांची सुनबाई झाली 'प्राण्यांची डॉक्टर'; नणंद साराची प्रतिक्रिया चर्चेत

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिन

Georgis Gor, Devendra Fadnavis : महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस!

- अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर यांच्याकडून कौतुक; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डायनॅमिक, एनर्जेटिक आणि कामाची

Sunetra Pawar : पिंपळवंडीतील बालिका अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर

Kishori Pednekar : महापालिका विरोधी पक्षनेत्या गोंधळलेल्या!

- पद टिकवण्यासाठी पेडणेकरांचा केविलवाणा प्रयत्न मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या शिस्तीमुळे नगरसेवक राहिले उपाशी

- सभागृहात उपहारगृह बंदीवरून तीव्र नाराजीचे उमटले सूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील उपहारगृहात

Rabies Injections : मुंबईत यापुढे एकही रुग्ण रेबीज इंजेक्शन नसल्याने परत जाणार नाही

- महापालिका प्रशासनाने सभागृहात दिली ग्वाही - भटके कुत्रे आणि त्यांच्या हल्ल्यामुळे प्रतिबंधित रेबीज उपलब्ध