उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे एका माजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या (ARTO) घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (व्हिजिलन्स) कारवाईदरम्यान घरातून मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी, रोख रक्कम आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. (Agra ARTO Raid)
पुणे-मुंबई घाट विभागातील (Pune-Mumbai Ghat Section) रेल्वे मार्गाच्या (Railway Line) दुरुस्तीच्या (Restoration Works) कामांचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला. मुसळधार ...
तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, माजी अधिकारी ललित कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर सुमारे २२ किलो सोन्या-चांदीचे दागिने, विटा आणि बिस्किटे सापडली. यामध्ये सुमारे १३ किलो सोनं आणि ९ किलो चांदीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय घरातून १.६२ कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. विविध ठिकाणी ठेवलेल्या नोटांच्या बंडलांची मोजणी करण्यासाठी तपास यंत्रणेला मोठी मेहनत घ्यावी लागली.
मुंबई : नंदीग्राम एक्सप्रेस (Nandigram Express) मधील फर्स्ट एसी (First AC) कोचमध्ये हनीमून (Honeymoon) साठी बर्थ फुलं आणि फुग्यांनी सजवल्याचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) ...
तपासादरम्यान माजी अधिकाऱ्याच्या नावावर आग्रा आणि इतर भागांमध्ये अनेक प्लॉट, शेतीजमीन आणि आलिशान मालमत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व मालमत्तेची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपांप्रकरणी सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालमत्तेचा स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.






