Devendra Fadnavis : फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी घेतली बैठक; सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश


 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या फनेल झोनमध्ये सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाला संबंधित यंत्रणांनी गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी याबाबत विधान भवन येथे आयोजित बैठकीत दिले. यासोबतच जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन निर्बंधाने बाधित असलेल्या इमारतींचाही पुनर्विकास कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.(Devendra Fadnavis)



या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित साटम, आमदार पराग अळवणी, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, फनेल क्षेत्रातील निर्बंध बाधित इमारतींच्या संदर्भात चटई निर्देशांक (एफएसआय) चे 'पोटेन्शिअल' कुठे द्यायचा आहे, याबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा. देण्यात येणारा चटई निर्देशांक कुठे वापरायचा आहे, याबाबत ठरविण्यात यावे. रस्ता रुंदीकरणाच्या प्रमाणे उच्च चटई निर्देशांक लगतच्या किंवा जवळील बांधकामात एकत्र करू शकता येईल का याबाबत पडताळणी करावी. बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी रस्त्याच्या रुंदीनुसार उच्चस्तरीय 'पोटेन्शिअल' असणारा चटई निर्देशांक देण्यात यावा.



मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, सिडको अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून गृहनिर्माणाचे कार्य होत असते. या संपूर्ण यंत्रणांचे नियमन व नियंत्रण नगर विकास विभागाने करावे. फनेल झोन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने 'मॅपिंग' करावे. जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन निर्बंध असलेल्या इमारतींची पुनर्विकास कार्यवाही गतीने पूर्ण करावी. बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी उच्च चटई निर्देशांक देऊन बांधकामाच्या एकत्रीकरणाला (क्लबिंग) मान्यता द्यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.(Devendra Fadnavis)
Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले