Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसानंतर अनेक सखल भाग जलमय झाले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही वीजपुरवठा खंडित (Power Outage) असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.



पूरामुळे घरांमध्ये अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नालासोपारा आणि वसई-विरारमधील अनेक भागांत दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.


वसई पश्चिमेतील सनसिटी येथील मुख्य वीज उपकेंद्र पाण्याखाली गेल्याने महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांचा वीजपुरवठा बंद केला आहे. याचा फटका सनसिटी, गास, निर्मळ, नालासोपारा आणि विरारमधील नागरिकांना बसला असून अनेक भाग अंधारात आहेत. (Flood News)



वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाइल टॉवर्स आणि स्थानिक इंटरनेट सेवांचाही बॅकअप संपला आहे. परिणामी इंटरनेट सेवा ठप्प झाली असून 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामकाज प्रभावित झाले आहे. संपर्क व्यवस्था खंडित झाल्याने नागरिकांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यातही अडचणी येत आहेत. (Virar latest News)


दरम्यान, प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पाणी ओसरल्यानंतर वीजपुरवठा आणि इतर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील