Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत किमान १४ कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Pune Building Collapsed)


ही घटना आज दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीमागील कचऱ्याचा मोठा ढिगारा अचानक इमारतीवर कोसळला. त्यामुळे इमारतीचा काही भाग क्षणार्धात जमीनदोस्त झाला. (Pune Building Collapsed)



घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल, महापालिका प्रशासन आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकालाही पाचारण करण्यात आले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. (Pune Building Collapsed)



प्राथमिक माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, पहिल्या मजल्यावर अद्याप १४ जण अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. एका गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने इमारतीवर कोसळलेला कचऱ्याचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत. (Pune Building Collapsed)


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे, मावळ आणि लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, पाणी साचणे आणि संरचनांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.