Wednesday, July 8, 2026

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील विद्यानिकेतन कॉलेजच्या मागे असलेल्या सम्राट मेडिकलवर जी+१ इमारतीचा पहिला मजला कोसळल्याने तिघेजण किरकोळ जखमी झाले.(Mumbai building collapse)

घटनेची माहिती सकाळी सुमारे ११.३२ वाजता मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी जखमींना खासगी वाहनातून जवळील खासगी रुग्णालयात हलवले होते. (Shanti Nagar accident)

या दुर्घटनेत खुशबू खान (२७) यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. आशिष सिंह (४०) यांच्या डाव्या हाताला, तर सुनील यादव (३०) यांच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

तिघांवर दीपांश क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले असून प्राथमिक उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (building collapse)

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे काही जीर्ण इमारती, झाडे कोसळल्याच्या घटना घडत आहे. (Mumbai incident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा