Nandur Madhmeshwar : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधुन 28 हजार 934 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nandur Madhmeshwar News : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणची नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक धरणांमधून आता विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar) बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात (Godavari River) १५ हजार २४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता याच निसर्गाच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.



विसर्गात वाढ होण्याची शक्यता


सुरुवातीला नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) बंधाऱ्यामधुन 18403 क्युसेक्स ने विसर्ग चालू होता तरी तो विसर्ग दुपारी 2 वाजता 10531 क्युसेक्स ने वाढ करून एकूण 28934 क्यूसेक्स करण्यात आला आहे.सदर विसर्गात टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. (Nandur Madhmeshwar News)



त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचे रौद्ररूप


दरम्यान दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनंतर, आज (बुधवारी) मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर नगरीत (Trimbakeshwar ) मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकनगरीत पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वरमधील मुख्य रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, काही सखल भागांत तब्बल पाऊण तास पाणी साचून राहिले होते.



(धरणामधून होणारा विसर्ग (क्युसेकमध्ये))


गौतमी गोदावरी - २२०८


पालखेड २७४०


होळकर पूल २२२७


एन एम वेअर - ४०१२३

Comments
Add Comment

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा