Nashik Kasara Ghat : नाशिक शहरासह जिल्ह्यात रविवारपासून पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे. नाशिक जिल्हयातील इगतपुरी तालुक्यात गेल्या २४ तासांत २०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशातच नाशिक-मुंबई महामार्गाला (Nashik-Mumbai Highway) जोडणाऱ्या जुन्या कसारा घाटात दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. ( Nashik Kasara Ghat Landslide )
खाजगी भागीदारीचा विचार नाही; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सकारात्मक स्पष्टीकरण मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ...
जुन्या कसारा घाटात दरड कोसळली
नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात हिवाळा पाँईट जवळ काही प्रमाणात डोंगरावरून दरडीसह माती व दगड रस्त्यात पडली आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घडली आहे. घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दरडी हटवुन महामार्ग सुरळीत केला. इगतपुरी तालुक्याला काल पासून रेड अलर्ट दिल्यामुळे व ढगफुटी होणार असल्याच्या माहितीमुळे प्रशासन अलर्ट मोडवर होते. त्यामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाने दरड हटवली असुन कसारा घाटातून वाहतुक संथ गतीने सुरळीत चालू आहे. ( Nashik Kasara Ghat Landslide )
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा; बजरंग खरमाटे प्रकरणात 'एसआयटी' स्थापन मुंबई : प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागातील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली ...
नाशिकवरील ढगफुटीसदृश पावसाचे संकट टळले
दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरावर घोंगावणारे ढगफुटीसदृश (Cloudburst) पावसाचे मोठे संकट तूर्तास टळले आहे. नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला होता. मंगळवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहर परिसरात काही काळ विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर,आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे.
नर्स पत्नीची क्रूरता पाहून पोलीसही हादरले; पतीला मारण्यासाठी आखला प्लॅन तेलंगणा : तेलंगणामध्ये विवाहबाह्य संबंधातून पतीच्या हत्येचा (Murder) धक्कादायक ...
वाऱ्याची दिशा बदलली , ढग सुरतच्या दिशेने
हवामान विभागाने पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा (Vortex) मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, आता भोवरा इतर दिशेने वळल्यामुळे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळण्याची शक्यता आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल ४५० मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस पडला होता. हाच भोवरा पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि गुजरातच्या (Gujarat) सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका आता टळला आहे. दरम्यान, नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.