Navanath Ban : 'रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा सुरू'; संजय राऊतांवर नवनाथ बन यांचा घणाघात

- महाभारतात संजय हा दुर्योधन आणि कौरवांच्या बाजूने होता


मुंबई : भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navanath Ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'रामरक्षा आंदोलन' हे प्रत्यक्षात पक्ष आणि राजकीय अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न असून, जनतेसमोर कितीही नाटकी भूमिका घेतली तरी सत्य लपवता येणार नाही, असा आरोप नवनाथ बन यांनी केला.



... म्ह्णून तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही :


नवनाथ बन (Navanath Ban) म्हणाले की, रामरक्षा आंदोलन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पुस्तक वाचूनही रामरक्षेचे श्लोक म्हणता आले नाहीत. तसेच संजय राऊत यांनाही रामरक्षा म्हणता आली नाही. "प्रभू श्रीरामांचे विचार आणि हिंदुत्व स्वीकारले नसल्यामुळेच तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही. पक्ष, आमदार आणि नगरसेवक वाचवण्यासाठी हे आंदोलन सुरू असले, तरी जनता सर्व पाहत आहे. तुमचा धूर्तपणा आणि अहंकार ओळखून राज्यातील जनता योग्य वेळी उत्तर देईल," असा टोला त्यांनी लगावला.



ठाकरे गटाने शहराची लूट केली :


मुंबईतील विकासकामांवरूनही बन (Navanath Ban) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "ठेकेदारी, कमिशनखोरी आणि वसुली हा उद्धव ठाकरे गटाचा व्यवसाय राहिला आहे. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवूनही त्यांनी शहराची लूट केली. भाजपाला लोकसेवेचे धडे देण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही," असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, "महायुती सरकारला सत्तेत येऊन अवघे सहा महिने झाले आहेत. या काळात आम्ही विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दुरुस्त करून पुढे जाण्याची आमची भूमिका आहे. आम्ही जनतेमध्ये राहून काम करणारे आहोत, घरात बसून राजकारण करणारे नाही."



नैसर्गिक आपत्ती सरकारच्या नियंत्रणात नसते :


लोणावळा परिसरातील मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. "एका तासात तब्बल ६०० मिमी पाऊस झाल्यामुळे ही घटना घडली. नैसर्गिक आपत्ती सरकारच्या नियंत्रणात नसते, मात्र त्यानंतरची मदत आणि दुरुस्तीची जबाबदारी सरकार पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे," असे बन (Navanath Ban) यांनी सांगितले.



मानखुर्द अपघात : मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा


मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबतही त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. "घटना घडताच मी (Navanath Ban) स्वतः आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) घटनास्थळी पोहोचलो. महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. संकटाच्या काळात रस्त्यावर उतरून लोकांच्या पाठीशी उभे राहणारे आम्ही आहोत," असे त्यांनी म्हटले.



संजय हा दुर्योधन आणि कौरवांच्या बाजूने होता :


शेवटी महाभारताचा संदर्भ देत नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा टीका केली. "महाभारतात संजय हा दुर्योधन आणि कौरवांच्या बाजूने होता. त्याचप्रमाणे तुम्हीही मुंबईची लूट केली, मुंबईकरांवर अन्याय केला. महाविकास आघाडीच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली. आता जनतेची सेवा करणारे सरकार सत्तेत असून पायाभूत सुविधा, विकासकामे आणि आपत्कालीन मदत यावर भर दिला जात आहे. खंडणी आणि लुटीचे राजकारण करणाऱ्यांची सत्ता आता संपली आहे," अशा शब्दांत त्यांनी (Navanath Ban) विरोधकांवर टीका केली.

Comments
Add Comment

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

West Bengal : पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपाध्यक्ष आशिष बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात उचलले टोकाचे पाऊल

रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या