Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका डोंबिवलीतील एमआयडीसी (MIDC) निवासी भागाला बसला आहे. या परिसरातील नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने पावसाचे आणि नाल्याचे पाणी थेट परिसरातील अनेक बंगल्यांमध्ये व घरांमध्ये शिरले आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ उघडे पडले आहे.



घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान


सविस्तर माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंबिवलीतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. मात्र, एमआयडीसी निवासी विभागात परिस्थिती अधिकच गंभीर बनली. परिसरातील नाल्यांची पाणीपातळी वाढून हे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरांत आणि बंगल्यांच्या आवारात घुसले. अचानक घरात पाणी शिरल्याने रहिवाशांची मोठी तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्या आणि इतर जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.



वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे हाल


केवळ घरांमध्येच पाणी शिरले असे नाही, तर परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी, कामावर जाणाऱ्या नोकरदारांना, शाळकरी मुलांना आणि सर्वसामान्यांना पाण्यातून वाट काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Ethanol Free Petrol Finder : इथेनॉलमुक्त पेट्रोल हवंय? घरबसल्या असा शोधा तुमच्या जवळचा पंप!

नवी दिल्ली : देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर सध्या E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. केंद्र

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची