Asiatic Society of Mumbai : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे विजयी; 'एशियाटिक टुमॉरी' पॅनेलचा सर्व 19 जागांवर विजय

मुंबई : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या (Asiatic Society of Mumbai) बहुचर्चित आणि अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुका अखेर शनिवारी पार पडल्या. या निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरी' पॅनेलचे विनय सहस्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) अध्यक्षपदी निवडून आले. त्यांच्या पॅनेलने अध्यक्षपदासह एकूण १९ पदांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. तर कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील 'सेव्ह एशियाटिक' पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला.


अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे यांना ३४९ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी कुमार केतकर यांना १५० पेक्षाही कमी मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेच्या सुमारे २,५०० सदस्यांपैकी ५०० हून अधिक सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.



या निवडणुकीपूर्वी दोन्ही पॅनेलमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. कुमार केतकर (Kumar Ketkar) यांच्या गटाने संस्थेवर राजकीय प्रभाव वाढवण्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सहस्रबुद्धे यांच्या गटाने संस्थेत अनेक वर्षे विशिष्ट विचारांच्या लोकांनाच संधी दिली गेल्याचा दावा केला होता.


या निवडणुका मूळतः नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार होत्या. मात्र मतदार यादीतील कथित अनियमितता, सदस्यत्वावरील वाद आणि विविध न्यायालयीन याचिकांमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भातील अनेक याचिका फेटाळल्यानंतर अखेर मतदानाचा मार्ग मोकळा झाला.


धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्यानंतर सुधारित मतदार यादीच्या आधारे मतदान प्रक्रिया पार पडली. (Mumbai News)



उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रमेश पतंगे (३२९), नितीश भारद्वाज (३२८), द्विवेदी (३२७) आणि देशमुख (३२३) हे विजयी झाले.


व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत प्राची मोघे (३४१), माधव भांडारी (३३९), मल्हार कुलकर्णी (३३३), प्रमोद बापट (३२९), व्ही. चक्रवर्ती (३२४) आणि राजेश बेहरे (३२१) यांनी विजय संपादन केला.


तपासणी (स्क्रुटिनायझेशन) समितीच्या निवडणुकीत स्नेहल नागरकर यांनी सर्वाधिक ३७० मते मिळवली. त्यांच्यासोबत अभिजीत मुळे (३६२), माधवी (३६२), उमंग काळे (३५८), अमोघ जाधव (३४९), मल्हार गोखले (३४८) आणि दत्तात्रय पांचवाघ (३४४) हेही विजयी झाले.


निकालानंतर विनय सहस्रबुद्धे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. एशियाटिक सोसायटीला पुन्हा तिचे वैभव मिळवून देण्यासाठी आणि नव्या पिढीला या संस्थेशी जोडण्यासाठी सर्वसमावेशक पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध