Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके














ठाण्यातील धक्कादायक घटना, आईने साडेतीन वर्षाच्या मुलाला दिले गरम चटके, गुन्हा दाखल 



ठाणे : आई आणि मुलाच्या नात्याला मायेचे प्रतीक मानले जाते. मात्र ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडलेल्या एका घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. किसन नगर भागात साडेतीन वर्षांच्या मुलावर त्याच्याच आईने अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ( Thane News)



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने आपल्या आजीकडे आईकडून होणाऱ्या मारहाणीची माहिती दिली. तसेच गरम उलथण्यानं हात-पायांवर चटके दिल्याचेही त्याने सांगितले. हे ऐकून आजीने तातडीने त्याला घेऊन स्थानिक शिवसेना मध्यवर्ती शाखेत धाव घेतली. (Crime News)


बालकाच्या अंगावरील जखमा पाहून उपस्थितांनाही धक्का बसला. त्यानंतर शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी वेळ न दवडता मुलाला जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



यानंतर सुनील मोरे आणि महिला पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतले आणि वागळे इस्टेट पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा (FIR) नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, स्वतःच्या मुलाशी अशी अमानुष वागणूक करणाऱ्या महिलेला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, मुलावर अत्याचार का करण्यात आला आणि त्यामागील कारण काय होते, याचा शोध घेतला जात आहे.









Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे