BEST News : बेस्टच्या चालकांच्या पगाराचा प्रश्न मिटला

तब्बल १९० बस चालक महापालिकेत उसनवारी तत्त्वावर देणार सेवा


महापालिका बेस्टला मोजणार ३०.६२ कोटी रुपये


- सचिन धानजी


मुंबई : तोट्यात चालणाऱ्या बेस्टला आता मुंबई महापालिका (BMC) मोठा हातभार लावणार असून काही अंशी बसून असलेल्या बस चालकांचा भार आपल्या खांद्यावर घेतली आहे. बेस्टमधील तब्बल १९० उसनवारी तत्त्वावर घेऊन त्यांचा पगाराचा खर्च महापालिका प्रशासन उपक्रमाला अदा करणार आहे. पुढील एक वर्षांकरिता या बस चालकांची सेवा घेतली जात असून यासाठी अतिकालीन भत्त्यासह मासिक पगार स्वरूपात १ लाख२९ हजार १४८ रुपये मोजणार आहे. यासाठी बेस्ट (BEST) उपक्रमाला ३०.६२ कोटी रुपये या चालक सेवेसाठी अदा केले जाणार आहेत.


सद्यस्थितीत मुंबई महापालिकेच्या उपलब्ध वाहनचालकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे प्रकारच्या वाहनसेवा पुरविताना अनेक अडचणी निर्माण होतात. महापौर, उप महापौर, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष तसेच, महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सह आयुक्त/उप आयुक्त, संचालक, अधिष्ठाता, खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त इत्यादींना घकव्य परिवहन खात्यामार्फत वाहनसेवा पुरविल्या जातात. पण अशा वाहनसेवा सुरळीत व विनाखंडीत चालू ठेवण्यासाठी, परिवहन विभागातील कार्यरत वाहन चालकांकडून अतिकालीन वेळेत काम करून घेणे अपरिहार्य ठरत आहे. तसेच, वाहनचालकांच्या कमतरतेमुळे वाहनसेवांचा पुरवठा अनियमित होतो.



त्यामुळे त्यामुळे वाहन चालकांची चालकांची अपुरी संख्या आणि परिवहन विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची संख्या यातील तफावत दूर करण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रथमत: बेस्ट (BEST) उपक्रमांकडून एक वर्षाच्या कालावधी करता व आवश्यकता भासल्यास अधिक एक वर्षाकरिता बेस्ट कडील १९० वाहन चालक उसनवारी तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मागील एप्रिल महिन्यात चर्चा आणि पत्रव्यवहार झाल्यानंतर या वाहन चालकांना प्रति माह सरासरी वेतन ८४,०३४ रुपये अधिक अतिकालीन भत्ता वेतनाची प्रतिपूर्ती करण्याबाबत बेस्टने महापालिकेला कळवले आहे. त्यानुसार बेस्टचे १९० बस चालक हे मुंबई महापालिकेत उसनवारी तत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यामुळे महिन्याला १०० तास असे गृहीत धरून साठी मासिक ४५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १९ हजार १४८ रुपये याप्रमाणे १९० चालकांचे ३० कोटी ६२ लाख ३५ हजार ७३८ रुपये एवढी रक्कम अदा करण्यात येत आहे. आयुक्तांनी आपल्या अधिकारात ५० लाख रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतल्याने मागील महिन्यांपासून या चालकांची सेवा महापालिकेला मिळत असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता त्याला रीतसर मान्यता घेण्यासाठी स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव ठेवला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


मुंबई महानगरपालिकेच्या, शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील विभाग कार्यालये, रुग्णालये, उद्याने, परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन इत्यादी खात्यांना धकव्य परिवहन खात्यामार्फत विविध प्रकारची वाहनसेवा जसे, कचरा वाहने, मलनिःसारण वाहने, अतिक्रमण निर्मूलन वाहने, ट्रक वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, श्वान वाहने इत्यादी वाहनसेवा विनाखंडीत पुरविण्यात येत असतात.

Comments
Add Comment

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक

Mulund Dumping Ground : धारावी विकास प्रकल्प कामासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा देणार ५ वर्षांसाठी

  सचिन धानजी तब्बल १५ एकरची जागा वापर कास्टींग यार्ड, प्रीकास्टच्या निर्मितीसाठी महापालिकेला १०३ कोटी

Tree Cutting : मुंबईत महापालिका प्रकल्पांसह विद्युत कंपनीसह इमारत बांधकामांत कापली जाणार १४४३ झाडे

  सचिन धानजी कापण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात लावली जाणार २१ हजारांहून अधिक झाडे मुंबई : मुंबईत (Mumbai) येत्या