मागील सहा तासात पावसाने मुंबईला झोडपले... अनेक परिसर जलमय, वाहतुकीसाठी मार्ग केले बंद

मुंबई  : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहराच्या तुलनेत पूर्व उपनगरात सर्वाधिक जास्त पाऊस पडला आहे. तर त्या खालोखाल पश्चिम उपनगरात पावसाची अधिक नोंद घ्यावी आहे. उपनगरातील अनेक भागात पाणी साचले असून यासाठी काही बेस्ट मार्ग बंद करण्यात आले तर काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले आहेत. दरम्यान बैगनवाडी येथे घराचा भाग कोसळून दोन जखमी झाले आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बस मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. भांडुप एलबीएस मार्गावर रस्ता खचल्याने या मार्गावरही वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त होत आहे.



भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सत्रा सुटी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षात जाऊन मुंबईतील विविध भागातील परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांसह घेतला.





  • सरासरी पाऊसः सकाळी ०८ ते दुपारी २ वाजेपर्यंत

    शहर-३८ मिमि

  • पूर्व उपनगरे: ९६ मिमि

  • पश्चिम उपनगरे : ८३ मिमि

  • सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आलेली ठिकाणेः-



  1. शहर - कुलाबा पंपींग स्टेशन ६७ मिमि,
    प्रतिक्षा नगर मनपा शाळा,
    सायन ५८ मिमि,
    एफ/उत्तर विभाग ५१ मिमि,
    कुलाबा अग्रिशमन केंद्र ४७ मिमि
    रावळी कॅम्प ४७ मिमि

  2. पूर्व उपनगरेः विक्रोळी पश्चिम १६४ मिमि,
    टागोर नगर मनपा शाळा विक्रोळी १५५ मिमि, पाचपोली मनपा शाळा पवई १५४ मिमि,
    विक्रोळी अग्रिशमन केंद्र १४५ मिमि,
    बर्वे नगर मनपा शाळा, घाटकोपर १३७ मिमि

  3. पश्चिम उपनगरेः वर्सोवा लगून १४४ मिमि,
    जोगेश्वरी १२८ मिमि,
    चकाला मनपा शाळा अंधेरी १२७,
    अंधेरी अग्रिशमन केंद्र १२५ मिमि,
    के पश्चिम विभाग कार्यालय १२४ मिमि

  4. पाणी साचलेली ठिकाणेः
    मुंबई उपनगरात सकाळी ८ पासून सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि समुद्रास दुपारी २५० बा. समुद्रास असणारी भरती यामुळे खालील ठिकाणांहून पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.




  • पूर्व उपनगरे - साकिनाका, काजूपाडा काळे मार्ग कुर्ला, अशोक नगर कुर्ला, छेडानगर जंक्शन चेंबूर, पवई, भांडूप,

  • पश्चिम उपनगरे: अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, गोरेगांव पूर्व, दहिसर


  • झाडे पडणेः शहरात १०, पूर्व उपनगरात १८ व पश्चिम उपनगरात ३६ अशा एकूण ठिकाणी फांद्या व झाडे पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, जीवितहानी नाही.

  • घरे / भिंती पडणेः
    शहरात १. पूर्व उपनगरात ३ व पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण ९ ठिकाणी घरे / भिंती पडण्याच्या घटना घडल्या.

  • बेंगनवाडीत घराचे भाग कोसळून दोन जण जखमी

  • दुपारी १.२२ वा. अग्रिशमन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार प्लॉट नं २१, जी लाईन रोड नं. १०, बैंगनवाडी येथे तळमजला अधिक एक मजला असे बांधकाम असलेले घर पडले. सदर घटनेत १ पुरुष व १ महिला जखमी झाली असून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

  • पश्चिम रेल्वेः नालासोपारा व वसई येथे रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनीटे उशिराने सुरु आहे.

  • मध्य रेल्वेः मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे.

  • बीईएसटीः रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे पश्चिम उपनगरातील ५ व पूर्व उपनगरात १ ठिकाणी बीईएसटीची वाहतूक वळविण्यात आली आहे.

  • रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे अपघात होऊ नये याकरिता वाहतूक पोलीसांच्या मदतीने बंद करण्यात आलेले रस्तेः




बसमार्ग केले बंद


चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. नागरिकांनी याची नोंद घेऊन या रस्त्यांवर प्रवास करणे टाळावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


भांडुप एलबीएस मार्ग वर रस्ता खचला


एलबीएस मार्ग, एशियन पेंट समोर, भांडूप (पश्चिम) येथे १००x१०० फुट रस्ता खचल्यामुळे तेथे असणारी झाडे पडली. या ठिकाणी सुरु असलेल्या खोदकामाच्या ठिकाणी रस्त्यावरील एक गाडी खाली गेली. एस विभागामार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात आली असून रस्ता बॅरीगेट करण्यात आला आहे. या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

Comments
Add Comment

Mumbai Rain : धक्कादायक! भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब

पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही

Mumbai Hit And Run : मुंबईच्या जोगेश्वरीत भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील

Mumbai Tree Collapse Incidents : मुंबईतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर पडझड होते कशी?

मुंबई : मुंबईत चेंबूर (Chembur) येथील झाडांच्या दुघर्टनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असून आतापर्यंत एक लाखांहून

Mumbai Red Alert : मुंबईला दोन दिवसांचा रेड अलर्ट! ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात पावसाचा (Rain) जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रादेशिक हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) मुंबई, ठाणे,

महापौरांच्या दालनात शिरुन विरोधी पक्षनेत्यांची कर्मचाऱ्यांना दमदाटी

महापौरांनी केला घुसखोरीचा आरोप, पोलिसांत नोंदवणार तक्रार मुंबई  (Mumbai): मुंबई महापौर रितू तावडे या कार्यालयात

रुग्ण संवाद, उपचार आणि चिकित्सेसाठी आता वैद्य एआय विकसित

रूग्णालय तसेच दवाखान्याच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रणालीचा वापर मुंबई : रूग्णांशी संबंधित रक्तचाचणी