Aamir Khan Wedding : आमिर खान-गौरी स्प्रॅटचा खासगी विवाहसोहळा; फक्त १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण, 'ते' दोन खास मित्र चर्चेत

मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट'(Mr. Perfectionist) आमिर खान ५ जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर आमिरने स्वतःच लग्नाची पुष्टी करत हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


'प्रीतम अँड पेड्रो' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान आमिर खान म्हणाला, "होय, मी ५ जुलै रोजी लग्न करत आहे. हा अत्यंत खासगी विवाहसोहळा असून आम्ही तो घरीच आयोजित केला आहे. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्रच उपस्थित राहतील. आम्हाला सर्वांचे आशीर्वाद हवेत."



फक्त मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती :


मिळालेल्या माहितीनुसार, आमिर आणि गौरी यांनी लग्नासाठी केवळ १०० ते १५० पाहुण्यांनाच निमंत्रण दिले आहे. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि बॉलिवूडमधील काही निवडक कलाकारांचा समावेश आहे. हा विवाहसोहळा कोर्ट मॅरेजनंतर घरगुती पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


हे दोन खास मित्र ठरले चर्चेचा विषय :


या लग्नाच्या तयारीत आमिर खानचे दोन जुने आणि जवळचे मित्र विशेष चर्चेत आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी लग्नाच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी आमिर आणि गौरीला विवाहसोहळ्याच्या नियोजनात मार्गदर्शन केले. लग्नाचा दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरावा, अशी त्यांची इच्छा असल्याचेही सांगितले जात आहे.



बॉलिवूडमध्ये अनेक भव्य विवाहसोहळे पाहायला मिळाले असले, तरी आमिर आणि गौरी यांनी साधेपणाला प्राधान्य देत खाजगी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय