Sakinaka Manhole Accident : मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधमोहीमेदरम्यान आढळून आला आहे.


दुपारी १२.२६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी मॅनहोलची देखभाल करण्यासाठी झाकण उघडून काम करत होते. त्याचवेळी मोबाईलवर बोलत असलेली एक व्यक्ती उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने थेट त्यात पडली. (Sakinaka Manhole Accident) या दुर्घटनेत निष्पाप ६० वर्षीय अस्लम शेख यांना आपला जीव गमवावा लागला.



महानगरपालिका विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल : 


घटनेनंतर कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मॅनहोलमध्ये शिडी सोडून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्या व्यक्तीची छत्री आणि चप्पल एवढ्याच वस्तू सापडल्या. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने संबंधित व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), साकीनाका पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित महानगरपालिका विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या शोधमोहीमेनंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह दिसून आला असून, अग्निशमन दलाकडून तो बाहेर काढण्यात आला.  (Sakinaka Manhole Accident)



पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू : 


या घटनेमुळे मुसळधार पावसात सुरू असलेल्या देखभाल कामांदरम्यान उघडे मॅनहोल सुरक्षितपणे बंदिस्त न ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, संबंधित खासगी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Sakinaka Manhole Accident)



तात्काळ कडक कायदेशीर कारवाईची मागणी :


मुंबईचे उपमहापौर संजय घाडी आणि प्रभाग समिती अध्यक्ष विजेंद्र शिंदे यांच्यासोबत साकीनाका खैरानी रोड येथील मॅनहोल दुर्घटनास्थळाला भेट दिली. या दुर्घटनेत निष्पाप अस्लम शेख यांना आपला जीव गमवावा लागला, ही अत्यंत क्लेषदायक घटना आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार 'एल' वॉर्डचे सहाय्यक आयुक्त, संबंधित कंत्राटदार आणि सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. (Sakinaka Manhole Accident)


Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक