Mumbai Rain : मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा! २४ तासांत शहरात १७२ मिमी पावसाची नोंद; रात्री अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज सकाळी ८ वाजता दिलेल्या अंदाजानुसार, दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून आज रात्री आणि उद्या पहाटे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस (Extremely Heavy Rainfall) पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


याशिवाय ताशी ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Rain)



मागील २४ तासांतील सरासरी पावसाची नोंद :


(१ जुलै सकाळी ८ ते २ जुलै सकाळी ८ वाजेपर्यंत)


मुंबई शहर (City) : १७२ मिमी
पूर्व उपनगर (Eastern Suburbs) : १८९ मिमी
पश्चिम उपनगर (Western Suburbs) : १६५ मिमी (Mumbai Rain)



सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे


मुंबई शहर (City):


एफ साऊथ वॉर्ड कार्यालय – २२२ मिमी
जी साऊथ वॉर्ड कार्यालय – २२०.४ मिमी
सेवरी कोळीवाडा महानगरपालिका शाळा – २०८.८ मिमी
बी नाडकर्णी पार्क, वडाळा – २०८.४ मिमी
एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ – २०२.८ मिमी (Mumbai Rain)


पश्चिम उपनगर (WS):


एसडब्ल्यूएम सांताक्रूझ वर्कशॉप – २३८.८ मिमी
अंधेरी अग्निशमन केंद्र – २२५.४ मिमी
नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ – २१६.४ मिमी
कूपर रुग्णालय – २१२ मिमी
मारोल अग्निशमन केंद्र – २१० मिमी (Mumbai Rain)



पूर्व उपनगर (ES):


एस वॉर्ड कार्यालय – २३८.८ मिमी
पासपोली पवई महानगरपालिका शाळा – २३४.६ मिमी
टागोर नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी – २३३.२ मिमी
मिठागर महानगरपालिका शाळा, मुलुंड – २२६ मिमी
मानखुर्द अग्निशमन केंद्र – २२२.६ मिमी (Mumbai Rain)



भरती-ओहोटीची वेळ :


उच्च भरती (High Tide): दुपारी १.४५ वाजता – ४.२७ मीटर
शुक्रवार ३ जुलै रोजी पहाटे १.३१ वाजता – ३.७१ मीटर
ओहोटी (Low Tide): सायंकाळी ७.४९ वाजता – १.८२ मीटर
शुक्रवार ३ जुलै रोजी सकाळी ७.११ वाजता – ०.८८ मीटर (Mumbai Rain)


उच्च भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता अधिक असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे आणि वाहतूक तसेच रेल्वे सेवांबाबत अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Rain)




Comments
Add Comment

Devendra Fadnavis's Birthday : वाढदिवस समाजसेवेला अर्पण! मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप प्रदेश कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त (Devendra Fadnavis's Birthday) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश

Mumbai Lake : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलावही ओसंडून वाहू लागला

सचिन धानजी मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी (Lakes) तानसा तलाव बुधवारी २२ जुलै रोजी वाहू लागला.

BMC Building : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी..

सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) कारभारावर टीका होत असताना तसेच भविष्यातील आर्थिक संकटाबाबत चिंता

BMC Action Mode : स्वच्छतेच्या मुद्द्यावर महापालिका ऍक्शन मोडवर

कामकाजात कुचराई करणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करा, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांचे

BMC News : महापालिका कार्यालयांसह रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आता पचापच बंद

मुंबई : मुंबईत (Mumbai) मोठ्याप्रमाणात तंबाखू (Tobacco), पान तसेच, मावा यांचे सेवन केले जात असून यामुळे बऱ्याचदा महापालिका

BMC : महापालिका सभेपाठोपाठ वैधानिक समित्यांचेही थेट प्रक्षेपण?

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात