PM Modi : पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान ताकाईची यांनी मारुती सुझुकी खरखोडा प्लांटचे केले उद्घाटन

नवी दिल्ली : भारतातील वाहन उद्योगात गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी गुंतवणूक आता प्रत्यक्षात साकार झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) आणि जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हरियाणातील खरखौदा येथे मारुती सुझुकी इंडियाच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. हा मेगा प्रकल्प भारत-जपान आर्थिक भागीदारी अधिक दृढ होत असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानला जात आहे.



हा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा भारत-जपान आर्थिक मंचा च्या निमित्ताने आयोजित करण्यात आला.या मंचात जपानमधील १५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. उत्पादन, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), स्वच्छ ऊर्जा आणि गतिशीलता (मोबिलिटी) या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहकार्य आणखी वाढवण्याच्या दिशेने काम करत आहेत. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या १ ते ३ जुलैदरम्यानच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १६व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतही या उद्घाटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.


दौऱ्यापूर्वी जपानचे उपमुख्य मंत्रिमंडळ सचिव मसानो ओझाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारत-जपान आर्थिक संबंधांमध्ये “ठोस आणि लक्षणीय प्रगती” होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. जपानमधील माध्यामांच्या वृत्ताचा हवाला देत ओझाकी यांनी सांगितले की, या दौऱ्यात सुमारे २ ट्रिलियन येन (सुमारे १२.५ अब्ज डॉलर) किमतीचे जवळपास १२० सहकार्य करार जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निधी जपानने भारतासाठी जाहीर केलेल्या १० ट्रिलियन येनच्या १० वर्षांच्या खासगी गुंतवणूक कार्यक्रमाचा एक भाग असल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.



गुरुग्राम, मानेसर आणि गुजरातनंतर खरखौदा येथील हा प्रकल्प भारतातील मारुती सुझुकीचा चौथा सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२२मध्ये व्हर्च्युअल माध्यमातून केली होती. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या भारतीय उपकंपनीने २५ फेब्रुवारी २०२५पासून येथे व्यावसायिक उत्पादन सुरू केले.सध्या या प्रकल्पातील दोन उत्पादन युनिट्स कार्यरत असून त्यांची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता ५ लाख वाहनांची आहे. टप्प्याटप्प्याने ही क्षमता वाढवून दरवर्षी १० लाख वाहने तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.सुमारे ८०० एकर क्षेत्रात उभारलेल्या या प्रकल्पात एकात्मिक सप्लायर पार्क विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादन कार्यक्षमता वाढण्यास आणि संपूर्ण उत्पादन परिसंस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.


मारुती सुझुकीने भारतात एकूण ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. खरखौदा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे मोठे आर्थिक लाभ दिसून येतील.या प्रकल्पातून थेट २१ हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.याशिवाय सहाय्यक उद्योग, लॉजिस्टिक्स सेवा, तसेच वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या पुरवठादारांमुळे मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.हा प्रकल्प मारुती सुझुकीच्या ‘सुझुकी स्मार्ट फॅक्टरी’ संकल्पनेवर आधारित असून भविष्यातील इंडस्ट्री ५.० तंत्रज्ञान लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे.


या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहकार्य करणारे रोबोट अर्थात ‘कोबॉट्स’ वापरण्यात आले आहेत. हे रोबोट उत्पादनातील अचूकता, उत्पादकता आणि कार्यस्थळावरील सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढवतात.हा प्रकल्प पूर्णपणे हरित (ग्रीन) संकल्पनेवर आधारित आहे. तो १०० टक्के नवीकरणीय ऊर्जेवर चालणार असून १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर केला जाईल. तसेच हा ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ तत्त्वावर कार्यरत असेल.


चालू आर्थिक वर्ष २०२६-२७मध्ये येथे दररोज १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक मालवाहतुकीसाठी प्रकल्प परिसरातच रेल्वे साइडिंग उभारण्यात येत असून, त्याद्वारे तयार वाहने रेल्वेमार्गे देशभर पाठवली जाणार आहेत. कंपनीच्या मते, खरखौदा प्रकल्प भारताला जागतिक वाहन उत्पादन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मारुती सुझुकी इंडिया आजही भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी असून देशातील एकूण प्रवासी वाहन विक्रीत तिचा सुमारे ५० टक्के वाटा आहे.

Comments
Add Comment

Tata Power Plant : कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची टाटा पॉवर प्लांटला भेट; औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेची केली पाहणी

मुंबई, दि. 3 : चेंबूर (Chembur) येथील माहूल रोडवरील टाटा पॉवरच्या थर्मल पॉवर जनरेशन स्टेशनला राज्याचे कामगार मंत्री ॲड.

India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही

Cyber Threat : इस्रो मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शहरात खळबळ उडाली

Indian Navy : एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून

Delhi Police : दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची(Pakistan) गुप्तचर संस्था

Supreme Court : 'एआय विनाशकारी; मानवी हस्तक्षेप आवश्यक' - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत सावधगिरीचा