Powai Lake : पवई तलाव भरला, पण मुंबईकरांना नाही काही फायदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील (Mumbai) कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव बुधवारी ०१ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. त्यामुळे हा तलाव भरला तरी याचा मुंबईला काहीही फायदा नाही. (Powai Lake)



मागील चार दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. हा तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर अर्थात ५४५५ दशलक्ष लीटर एवढा पाणी साठा आहे. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. गतवर्षी हा तलाव १८ जून२०२५ रोजी आणि त्यानंतर ८ जुलै २०२४ रोजी भरून वाहू लागला होता.


मात्र, आता पर्यंत हा तलाव जुलै महिन्यात भरला जात होता. परंतु मागील वर्षी प्रथमच जून महिन्यातच हा तलाव भरला होता. तर यंदा हा तलाव १ जुलै रोजी भरल्याने पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना मोठ्या भरतीच्या दिवशी तसेच मुसळधार पावसाच्या दिवसांमध्ये भीतीच्या छायेखाली राहावे लागणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या