Nashik Suicide News : ट्रॅव्हलचालकाची आत्महत्या, कर्ज वसुलीच्या छळाला कंटाळून विषप्राशन

Nashik Suicide News : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाने फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. वाहन कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली एजंट आणि गुंडांकडून होणाऱ्या मानसिक छळवणुक आणि तणावातून कंटाळून तरूणाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना नाशिकच्या आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल (Jatra Hotel) परिसरात समोर आली आहे.



कारमध्येच विष प्राशन करत आत्महत्या


सोमवारी आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरात राहणाऱ्या महेश दादासाहेब शिंदे (२७) या खासगी ट्रॅव्हल्सचालकाने कारमध्येच विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आडगाव पोलिसांच्या (Aadgaon Police) माहितीनुसार, मृत महेश शिंदे हे मूळचे नांदगाव तालुक्यातील शिंगवे येथील रहिवासी होते. गेल्या आठ वर्षांपासून ते नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात वास्तव्यास होते आणि ट्रॅव्हल व्यवसाय करत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून वाहन कर्ज घेतले होते.



वसुली एजंट आणि गुंडांकडून मानसिक छळ ?


मात्र, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीच्या वसुली एजंट आणि गुंडांकडून त्यांचा मानसिक छळ केला जात होता व त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. या सततच्या छळामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या महेश यांनी कारमध्येच विष प्राशन केले, असा आरोप आहे. दरम्यान, विष प्राशन केल्याचे समजताच त्यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



आकस्मिक मृत्यूची नोंद , तपास सुरु


आडगाव पोलिसांनी (Adgaon police) या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत महेश यांच्या नातलगांनी फायनान्सच्या गुंडांवर मानसिक छळ आणि गंभीर धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मृत महेश शिंदे यांनी सुसाईड नोट (Suicide note) लिहिली आहे का याचा शोध पोलीस घेत आहे. तसेच, मृताच्या कुटुंबाचे सविस्तर जबाब, मोबाइलमधील कॉल हिस्ट्री, संशयास्पद संभाषण आणि चॅटिंगचा कसून तपास केला जात आहे. दरम्यान, दोषींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी नातेवाईक आणि वाहनचालक युनियनने केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Dhule : जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, धुळ्यात नेमकं काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम

Anna Bansode : अनधिकृत बांधकामाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर

Nashik : कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली फसवणूक, बनावट वर्क ऑर्डर देत कंत्राटदाराला गंडा; आधी निविदा तपासा, मगच...

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर ( Nashik City Police ) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल तीन कोटी पाच

Shirdi : साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंवरून दिल्ली हायकोर्टाचे कडक निर्देश

Shirdi : शिर्डीतील साईबाबा आणि साईबाबा संस्थानविरोधात सोशल मीडिया आणि यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या बदनामीकारक तसेच

Sukhbir Singh Badal Attack : धक्कादायक! नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचारीही जखमी

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे  (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh