Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर ( Nashik City Police ) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवत संशयितांनी पाच बनावट कार्यारंभ आदेश तयार करून तक्रारदाराची फसवणूक केली. या प्रकरणानंतर कुंभमेळ्याशी संबंधित कोणतेही काम घेताना कंत्राटदारांनी निविदा आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी करावी, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी ( Nashik City Police ) केले आहे.
Shirdi : शिर्डीतील साईबाबा आणि साईबाबा संस्थानविरोधात सोशल मीडिया आणि यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या बदनामीकारक तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या ...
जामनेर येथील दोघे ताब्यात
या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील तनय महाजन ( Tanay Mahajan ) आणि नरेंद्र महाजन ( Narendra Mahajan ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांनी कुंभमेळ्यातील कामांची बनावट यादी तयार केली होती. तसेच भारत सरकारची राजमुद्रा, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची डिजिटल स्वाक्षरी आणि नाशिक महापालिकेच्या ( Nashik Municipal Corporation ) निविदा क्रमांकाचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार केली. तक्रारदाराला हाऊसकिपिंगचे काम मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासोबतच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची सुविधा, चादरी, बादल्या आणि पाणीपुरवठा अशा विविध कामांचे बनावट कार्यारंभ आदेश तयार करण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराकडून संशयितांच्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यात आले.
नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला ...
आतापर्यंत तीन गुन्हे दाखल
पोलिसांच्या तपासात संशयितांनी नाशिकमधील एका संगणक केंद्रावर हे बनावट कार्यारंभ आदेश तयार केल्याचे समोर आले आहे. प्रशासनातील कोणाचा या फसवणुकीत सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित निविदा, कार्यारंभ आदेश आणि अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करा, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.